Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गणित आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ३ सुवर्ण आणि १६ रौप्य पदके!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
International Olympiad

मुक्तपीठ टीम

भारतीय विद्यार्थ्यांनी गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण आणि १६ रौप्य पदके पटकावली. गणित ऑलिम्पियाड नॉर्वेमध्ये आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड आर्मेनियामध्ये आयोजित करण्यात आली होती, तर इतर दोन म्हणजे स्वित्झर्लंड आणि चीनमधली ऑलिम्पियाड दूरदृश्य प्रणालीमार्फत आयोजित करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड २०२२

नॉर्वे मधील ऑस्लो येथे ६ ते १६ जुलै २०२२ या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड २०२२ मध्ये भारतीय संघाने १सुवर्ण आणि ५ कांस्य पदके पटकावली. प्रांजल श्रीवास्तवने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये सलग तिसरे सुवर्ण पदक मिळवून हॅटट्रिक केली. आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये ३ सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. त्याच्या पदार्पणात, २०१८ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी, त्याने रौप्य पदक जिंकले आणि २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

इतर सहभागी अर्जुन गुप्ता, आदित्य वेंकट गणेश मांगुडी, अतुल शतावर्त नाडिग, वेदांत सैनी, कौस्तव मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड २०२२ मध्ये कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड २०२२ मध्ये एकूण ५८९ स्पर्धक सहभागी झाले होते.

International Olympiad

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (IBO) २०२२

आर्मेनियामधील येरेवन इथे १० ते १८ जुलै २०२२ या कालावधीत आयोजित ३३व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (IBO) २०२२ मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या चारही विद्यार्थ्यांनी पदके मिळवली. मयंक पंढरीने सुवर्णपदक, अमृतांश निगम, प्राची जिंदाल आणि रोहित पांडा यांनी रौप्य पदक मिळवले.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ६२ स्पर्धक आणि ३ निरीक्षक देश सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२२

फिजिक्स असोसिएशन ऑफ स्वित्झर्लंडने आयोजित केलेल्या ५२व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२२मध्ये भारताने चांगली कामगिरी केली. १० जुलै ते १७ जुलै २०२२ या काळात ऑनलाइन पद्धतीने या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व पाच भारतीय विद्यार्थ्यांनी मिळून १ सुवर्ण आणि ४ रौप्य पदके जिंकली. देवयांशु मालूने सुवर्णपदक, अभिजीत आनंद, अनिलेश बन्सल, धीरज कुरुकुंदा आणि हर्ष जाखर यांनी रौप्यपदक पटकावले.

या स्पर्धेत ७५ देशांतील एकूण ३६८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. देशनिहाय पदकतालिकेत सिंगापूर आणि कझाकिस्तानसह भारत संयुक्तपणे अकराव्या स्थानावर होता.

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) २०२२

चीनने आयोजित केलेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) २०२२ मध्ये सहभागी झालेल्या चारही भारतीय विद्यार्थ्यांनी पदके जिंकली. महित राजेश गढीवाला, निवेश अग्रवाल, तनिष्का रमेशचंद्र काबरा, चिन्मय खोकर या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. १०जुलै ते १८ जुलै २०२२ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने ही ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आली होती.

भारतातील चार लवाद सदस्यांनी आंतरराष्ट्रीय लवाद चर्चांमधे सहभाग घेतला: मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. नंदिता माधवन (आयआयटी बॉम्बे), मार्गदर्शक म्हणून डॉ. इंद्राणी दास (एचबीसीएसइ), तर वैज्ञानिक निरीक्षक म्हणून डॉ. श्रद्धा तिवारी (आयसीटी, मुंबई) आणि व्ही. सुदर्शन (बीएआरसी) यांनी चर्चेत भाग घेतला.


Tags: Gold Medalgood newsIndian studentsMaths and Science International Olympiadmuktpeethsilver medalगणित आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतीय विद्यार्थीमुक्तपीठरौप्य पदकसुवर्ण पदक
Previous Post

आता महिला तलवारबाजी लीग स्पर्धा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच तलवारबाजी स्पर्धा!

Next Post

शास्त्रीय नृत्यातील दिग्गज गुरूंना समर्पित ‘बेल्स इन रेझोनन्स’ संगीत महोत्सवाचे आयोजन 

Next Post
Classical Dance Guru

शास्त्रीय नृत्यातील दिग्गज गुरूंना समर्पित 'बेल्स इन रेझोनन्स' संगीत महोत्सवाचे आयोजन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!