Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नरेंद्र पाटलांचा मराठा आक्रोश मोर्चा…परवानगी नाकारल्यानं संताप! पण…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narendra Patil Maratha Aakrosh Morcha - (1)

मुक्तपीठ टीम

सोलापूरमध्ये आज माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा आयोजिक केला होता. सकाळी अकराला निघणाऱ्या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मोर्च्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांसमोर त्यांनी इतर मोर्चांना राज्यात परवानगी दिली जात असताना त्यांच्याच मोर्चाला दिली नसल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा अधिकार भाजपाची सत्ता असलेल्या केंद्रालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपाच्या जवळ असणाऱ्या नरेंद्र पाटलांचा आक्रोश राज्य सरकारविरोधात कशासाठी अशी चर्चाही होऊ लागली आहे.

 

सोलापूरात मराठा आरक्षणातासाठी आक्रोश

 

  • सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
  • या आक्रोश मोर्चात शेकडो मराठा आंदोलक सहभागी झाले होते.
  • सोलापूरच्या संभाजी चौकात काही वेळ हा मोर्चा थांबला.
  • मोर्चात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
  • ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा दणाणत होत्या.

 

माजी आमदार नरेंद्र पाटलांचा संताप

Narendra Patil Maratha Aakrosh Morcha - (3)

  • मोर्चासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती.
  • महाविकास आघाडीने पोलिसांचा दुरुपयोग केला.
  • सोलापुरात मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले.
  • राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली.
  • फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत.
  • ब्रिटीशांनीही आंदोलने दडपली नव्हती. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे.
  • आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली.
  • पण मराठ्यांचा आवाज दाबला तर पुढचा मोर्चा न सांगता काढू.

 

मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

Narendra Patil Maratha Aakrosh Morcha - 5

  • जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
  • आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
  • सोलापूरच्या वेशीवर अडवलेल्या मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आले.
  • त्यांना तात्काळ सोडून देण्यात आल्याशिवाय जागचे हलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

मुक्तपीठ मत: नरेंद्र पाटलांकडून वेगळी अपेक्षा

 

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्रातील भाजपा सरकारकडेच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
  • त्यामुळे आता कोरोना काळ असतानाही सोलापुरात गर्दी जमवण्याचा अट्टाहास कशासाठी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
  • माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी वेगळी भूमिका घेऊन उभे राहण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे.
  • मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे…पण त्यासाठी गल्लीत नाही तर आता दिल्लीत धडक देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्यातून भाजपालाही त्यांचं महत्व अधिक कळेल.
  • तसंही त्यांच्याकडील माथाडी कामगारांच्या शक्तीमुळेच भाजपा सध्या त्यांना महत्व देत असावी, त्यामुळे त्यांना दूर करण्याचा धोेका भाजपा पत्करणार नाही.

Tags: maratha aakrosh morchaMaratha Reservationnarendra patilsolapurआमदार नरेंद्र पाटीलनरेंद्र पाटीलमराठा आक्रोश मोर्चामराठा आरक्षणसोलापूर
Previous Post

चक्काजामबरोबरच वेगळ्या भूमिकेतून जानकरांनी दाखवली उपद्रवक्षमता!

Next Post

शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष…नेमका ओळखा धोका!

Next Post
toilet

शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष...नेमका ओळखा धोका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!