Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चक्काजामबरोबरच वेगळ्या भूमिकेतून जानकरांनी दाखवली उपद्रवक्षमता!

महादेव जानकरांनी सुनावलं, "एनडीए असो की यूपीए...ओबीसींना न्याय नाहीच! ओबीसी जनगणना हवी!!"

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mahadev Jankar OBC reservation Rasta roko

मुक्तपीठ टीम

महादेव जानकर आता पुन्हा आक्रमकरीत्या सक्रिय झाले आहेत. परतल्यानंतरचा त्यांचा आक्रमक बाणा फक्त सत्ताधारी आघाडीविरोधात नसून त्यांच्या एनडीएमधील मित्रपक्ष भाजपालाही खुपणारा आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पार्टीने महाराष्ट्रभर निदर्शने केली. त्यावेळी बोलताना जानकरांनी ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला. त्याचवेळी त्यांनी मारलेला “एनडीए असो की यूपीए…ओबीसींना न्याय मिळालेला नाहीच” असा टोला चर्चेचा विषय झाला आहे.

 

ओबीसी राजकीय आरक्षण रक्षणासाठी रासपाही मैदानात

  • ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार निदर्शने करण्यात आली.
  • मुंबईत महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानखुर्दला चक्काजाम आंदोलन केलं.
  • सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द केलं आहे.
  • त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत.
  • ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही.

 

जातीनिहाय जनगणनेची महादेव जानकरांची मागणी

  • ओबीसी जातींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.
  • त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे.
  • ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे.
  • एनडीए असो की यूपीए…ओबीसींना न्याय मिळालेला नाहीच

 

मुक्तपीठ विश्लेषण

  • महादेव जानकरांच्या वक्तव्यावरून त्यांचा प्रयत्न भाजपालाही त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करुन देण्याचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
  • “एनडीए असो की यूपीए…ओबीसींना न्याय मिळालेला नाहीच” हे त्यांचे विधान ओबीसी समाजाला त्यातही त्यांच्या धनगर समाजाच्या मनाला भिडणारे आहे, कारण धनगर समाजाच्या पाठिंब्याचा भाजपाचा चांगलाच फायदा झाला. मात्र, त्या समाजाची मागणी काही पूर्ण झाली नाही.
  • भाजपाने आधी डॉ.महात्मे यांना खासदार आणि त्यानंतर गोपीनाथ पडळकरांना आमदार बनवून धनगर समाजामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
  • भाजपाने विधानसभा निवडणुकीत चलाखीनं रासपाच्या उमेदवारांनी कमळाचा बी फॉर्म दिल्याचेही जानकरांना खटकले होते.
  • त्यामुळे यूपीए म्हणजे आघाडीसोबतच एनडीए म्हणजे भाजपालाही दोष देऊन जानकरांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं असावं.
  • भाजपा नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जातीनिहाय जनगणनेला प्रतिकुल मत व्यक्त केले असताना जानकरांनी थेट तीच मागणी करणे, उपद्रवक्षमता दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो.

 

 


Tags: mahadev jankarrspमहादेव जानकररासपा
Previous Post

बालभारतीची पाठ्यपुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार!

Next Post

नरेंद्र पाटलांचा मराठा आक्रोश मोर्चा…परवानगी नाकारल्यानं संताप! पण…

Next Post
Narendra Patil Maratha Aakrosh Morcha - (1)

नरेंद्र पाटलांचा मराठा आक्रोश मोर्चा...परवानगी नाकारल्यानं संताप! पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!