मुक्तपीठ टीम
सोलापूरमध्ये आज माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा आयोजिक केला होता. सकाळी अकराला निघणाऱ्या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मोर्च्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांसमोर त्यांनी इतर मोर्चांना राज्यात परवानगी दिली जात असताना त्यांच्याच मोर्चाला दिली नसल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा अधिकार भाजपाची सत्ता असलेल्या केंद्रालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपाच्या जवळ असणाऱ्या नरेंद्र पाटलांचा आक्रोश राज्य सरकारविरोधात कशासाठी अशी चर्चाही होऊ लागली आहे.
सोलापूरात मराठा आरक्षणातासाठी आक्रोश
- सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
- या आक्रोश मोर्चात शेकडो मराठा आंदोलक सहभागी झाले होते.
- सोलापूरच्या संभाजी चौकात काही वेळ हा मोर्चा थांबला.
- मोर्चात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
- ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा दणाणत होत्या.
माजी आमदार नरेंद्र पाटलांचा संताप
- मोर्चासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती.
- महाविकास आघाडीने पोलिसांचा दुरुपयोग केला.
- सोलापुरात मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले.
- राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली.
- फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत.
- ब्रिटीशांनीही आंदोलने दडपली नव्हती. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे.
- आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली.
- पण मराठ्यांचा आवाज दाबला तर पुढचा मोर्चा न सांगता काढू.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
- जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
- आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
- सोलापूरच्या वेशीवर अडवलेल्या मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आले.
- त्यांना तात्काळ सोडून देण्यात आल्याशिवाय जागचे हलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुक्तपीठ मत: नरेंद्र पाटलांकडून वेगळी अपेक्षा
- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्रातील भाजपा सरकारकडेच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
- त्यामुळे आता कोरोना काळ असतानाही सोलापुरात गर्दी जमवण्याचा अट्टाहास कशासाठी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
- माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी वेगळी भूमिका घेऊन उभे राहण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे.
- मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे…पण त्यासाठी गल्लीत नाही तर आता दिल्लीत धडक देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्यातून भाजपालाही त्यांचं महत्व अधिक कळेल.
- तसंही त्यांच्याकडील माथाडी कामगारांच्या शक्तीमुळेच भाजपा सध्या त्यांना महत्व देत असावी, त्यामुळे त्यांना दूर करण्याचा धोेका भाजपा पत्करणार नाही.