मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रेचा शेवटचा टप्पा आज कणकवली येथे पार पडला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केला. त्यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊतांवर थेट टीका केली आहे. दैनिक सामनामधून वैयक्तिक टीका करणे थांबवा अन्यथा प्रहारमधून लिहायला सुरुवात करेन. तुमच्या मालकाच्या मुले काय करतात, शिवसेनेचे नेते काय रतात ते पाहा. मीही गौप्यस्फोट करेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. राणेंच्या इशाऱ्यानंतर आता ठाकरेंच्या सामना विरुद्ध राणेंचा प्रहार असा नवा अतिटोकाचा अध्याय रंगण्याची शक्यता आहे.
नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार
- या दौऱ्यामध्ये अपशकुन आले.
- एक मांजर आडवी आली.
- मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही.
- त्यांनी सामनातून अग्रलेख लिहिले.
- आमच्या मुलावर बोलले.
- माझी दोन्ही मुलं चांगली आहेत.
- मात्र तुमच्या मुलांचे पराक्रम आधी बघा.
- मग आमच्यावर बोला.
- तोंडावर भेटल्यावर चांगले बोलायचं.
- लेखणी हातात आली आणि वरुन फोन आला तर ये रे माझ्या मागल्या करायचं हे धंदे सोडा.
- मलाही ‘प्रहार’मधून लिखान सुरू करावे लागेल
- संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करीत आहेत ते आधी पाहा.
- ‘राऊत यांनी माझ्या मुलांची बरोबरी करू नये.
- माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे.
- संजय राऊत यांनी वौयक्तिक गोष्टींवर बोलणं थांबवलं नाही तर, मलाही ‘प्रहार’मधून लिखान सुरू करावे लागेल.
- संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करीत आहेत.
- राऊत यांच्यामुळे शिवसेना वाढत नाहीये.
- ती अधोगतीकडे चालली आहे.
- ‘सामना’ची प्रतिमा बौद्धिक वर्गात चांगली
- कोणाचं बसणं उठणं कोणाबरोबर आहे.
- कोणाचे कोणत्या खटल्यांशी संबध आहेत.
- हे सगळं बाहेर काढेन.
- कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल.
- अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले आहेत.