Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास जोमाने होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा!”

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. केंद्रीय मंत्र्यांनी ठामपणे बजावले की त्यांना या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली हवी आहे आणि त्यासाठी मंत्रालयाच्या सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल. समाजाचे भले करण्यासाठी मंत्रालयाने अधिक खर्च करायला हवा असे ते म्हणाले. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि त्यातून अधिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न गाठणे शक्य होईल याकडे राणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

 

एनएसआयसी, एनव्हीसीएफएल आणि एसएलव्ही यांच्या अधिकाऱ्यांच्या योगदान करारावर आज नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्या कार्यक्रमात राणे बोलत होते. केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, एनएसआयसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एनव्हीसीएफएलच्या अध्यक्ष अलका अरोरा आणि एसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष के.सुरेश हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना विकास निधी मिळविण्यात येत असलेल्या विविध कमतरता भरून काढण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या निधींसाठी एका रकमेची घोषणा केली. परिणामी, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एनएसआयसी अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ या मिनी-रत्न महामंडळाची १००% उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. एआयएफ नियमांच्या अंतर्गत परवानगी असलेल्या इक्विटी, क्वासी-इक्विटी, आणि डेट यांच्या माध्यमातून ईमएसएमई उद्योगांना विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आणि १०,००६ कोटी रुपयांचा लक्ष्यित निधीसह एनव्हीसीएफएलने एसआरआय निधी अर्थात आत्मनिर्भर निधीची स्थापना करण्यात आली.

 

यासाठी एसबीआयसीएपी व्हेंचर्स मर्या (एसव्हीएल) या कंपनीची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली असून एनव्हीसीएफएलची कायदेविषयक सल्लगार म्हणून खेतान आणि कंपनी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एनव्हीसीएफएलने सेबी अर्थात ठेवी आणि विनिमय मंडळाकडे खासगी प्लेसमेंट मेमोरँडम सादर केले असून त्यायोगे १ सप्टेंबर २०२१ ला सेबीने एसआरआय निधीची दुसऱ्या श्रेणीच्या पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून नोंदणी केली.

 

एसआरआय निधी एमएसएमई क्षेत्रापुढील इक्विटी निधीच्या आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल आणि या उद्योगांना त्यांच्या पुढील अडचणी पार करण्यासाठी आवश्यक क्षमता देईल, कॉर्पोरेटायझेशनला प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या संपूर्ण पायाभूत क्षमतांसह जागतिक दर्जाचे विजेते म्हणून विकास पावण्यासाठी बळ देईल. सरकारी हस्तक्षेपासह, हा निधी कमी प्रमाणात निधी मिळालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे विविध प्रकारच्या निधींचे सुरळीत मार्गीकरण करेल आणि टिकाऊ व उच्च विकास क्षमता असणाऱ्या एमएसएमई उद्योगांच्या वाढीच्या समस्यांमध्ये मदत करेल.


Tags: MSMENarayan raneprime minister narendra modiSRIएसआरआय निधीकेंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मापंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ
Previous Post

‘गेल’च्या निविदा प्रक्रियेमध्ये हेराफेरी! दोन कंपन्यांना सीसीआयने दंड ठोठावला!!

Next Post

पुण्यात नातेवाईकाकडून अल्पवयीन मुलीची क्रूर हत्या…राज्य सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

Next Post
bibvewadi

पुण्यात नातेवाईकाकडून अल्पवयीन मुलीची क्रूर हत्या...राज्य सरकारविरोधात भाजपा आक्रमक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!