Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाकरे सरकारने राज्य रसातळाला नेले”

भाजपाचे खासदार नारायण राणे यांची टीका

April 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

 

ज्या व्यक्तीला प्रशासनाचा शून्य अनुभव आहे अशा व्यक्तीच्या हाती राज्याच्या कारभार दिल्यामुळे आज राज्याचे आर्थिक, औद्योगिक व नैतिकदृष्ट्याही पतन झाले असून संपूर्ण देशभरात भ्रष्टाचारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होऊन राज्याची प्रतिमा मलिन करण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

 

राणे म्हणाले की, कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने राज्य सरकारला सर्वोतपरी मदत करूनही केंद्र सरकारच्या नावाने वारंवार उलट्या बोंबा मारल्या जातात आणि वर राज्यात कोरोनावरून राजकारण न करण्याचे आवाहन विरोधी पक्षाला केले जाते. आज देशात सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात आहे, मृत्यूदरही अधिक आहे, लसीकरणाचा वेगही कमी आहे. रूग्णांसाठी औषधे, खाटा यांच्यासह डॉक्टर आणि परिचारिकांचाही तुटवडा असल्याचे राज्य सरकार सांगत आहे. मुळात या सगळ्या उपाययोजनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आरोग्य क्षेत्रासाठी कोट्यवधीचा निधी राखीव असतो त्यामधुन डॉक्टर व परिचारिकांचे रिक्त पदे का भरली जात नाहीत? “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” यानुसार हे राज्य मुख्यमंत्र्यांचे कुटुंब नाही का? राज्यातील जनतेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? राज्यात आता कोणतेही नवीन निर्बंध लावण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मुंबईभर फिरावे जनतेची परिस्थिती पाहावी मग निर्णय घ्यावेत. कोरोना रूग्णाच्या वाढीवरून हे सरकार सर्वच पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

 

राणे म्हणाले की, उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याची सुपारी वाजेंना कोणी दिलेली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. १०० कोटी खंडणी वसूल करण्याचे आदेश हे केवळ एकट्या देशमुख व परब यांचे नसून त्यामध्ये इतरही भागीदारी आहेत हे निश्चित.

 

राणे म्हणाले की, आज व्यापाऱ्यांकडून दुकान उघडल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात आहे. पण उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात नियमांची जी पायमल्ली केली त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित करत, सामान्य जनतेचे केवळ शोषण करायचे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम आहे, असा आरोप त्यांनी केला.


Tags: Narayan raneअनिल देशमुखकेंद्र सरकारठाकरे सरकारपरिवहन मंत्री अनिल परबविश्वास पाठक
Previous Post

गुजरात मा चाले छे…९०० विद्यार्थी, शिक्षकांना कोरोना लस, वय ४५पेक्षाही कमी!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, रस्ते वाहतुकीसाठी! रोखू नका!! आता शेतकरी काय करणार?

Next Post
delhi

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, रस्ते वाहतुकीसाठी! रोखू नका!! आता शेतकरी काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!