Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाना पटोले यांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला

March 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिवंडीवरून मुंबईत येत असताना त्यांना परेल येथील एका इमारतीला आग लागल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून पोलीस आणि फायर ब्रिगेडला माहिती दिली व स्वतः आगीच्या ठिकाणी जाऊन आग लागलेली इमारत व आजूबाजूच्या इमारतीतील लोकांना तात्काळ जागे करून बाहेर काढले. त्यांच्या या संवेदनशीलता आणि समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

 

केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात उपोषण केल्यानंतर नाना पटोले भिवंडी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेले होते. भिवंडी येथील कार्यक्रम आटोपून परतताना रात्री दोनच्या सुमारास नाना पटोले परेल येथून जात असताना लंडन वाईन शॉपच्या इमारतीला भीषण आग लागल्याचे दिसली.

 

नाना पटोले यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून आगीच्या ठिकाणाकडे धाव घेतली. त्यांनी स्वतः पोलीस आणि फायर ब्रिगेड, पोलीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करून आगीच्या घटनेची माहिती दिली. तसेच आग लागलेल्या व आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना जागे करून बाहेर काढले.

 

नाना पटोलेंनी समयसुचकता दाखवली. स्वत: धाव घेतली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही संपूर्ण आग आटोक्यात येईपर्यंत पटोले घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशिलतेबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.


Tags: nana patoleकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेकेंद्र सरकारनाना पटोले
Previous Post

पोलीस आयुक्तालयाचा सीसीटीव्ही पुरावा गायब करण्यात परमबीरसिंह यांचा हात?

Next Post

लहान मुलांचं आधारकार्ड कसं बनवाल?

Next Post
aadhar

लहान मुलांचं आधारकार्ड कसं बनवाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!