Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

February 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
patole

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदावर कोण? या चर्चेला आता काँग्रेस पक्षाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर टीका करत भाजपातून काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे देण्यात आली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होते. मात्र, आज दिल्लीतूनही यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषण करण्यात आली.

 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसने राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. अध्यक्षपदासाठी अनेक नावे स्पर्धेत होती. मात्र, त्यातून नाना पटोले यांची निवड करण्यात आली.

 

नाना पटोले यांच्याबरोबर सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यात यात शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम.एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

नाना पटोलेंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कशासाठी?

 

  • नाना पटोले यांची काँग्रेस पक्षापासूनच राजकारणाची सुरुवात केली होती.
  • त्यांनी नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
  • २०१४ मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली.
  • अल्पावधीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते स्वगृही परतले
  • २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली
  • महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आले होती.
  • विदर्भातील ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते म्हणून नाना पटोले ओळखले जातात.
  • पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील मराठा नेत्यांचा प्रभाव असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील ओबीसी नेत्याकडे दिल्याने सत्ता समतोल साधण्याबरोबरच मतदारांचा एक मोठा घटक पक्षाकडे वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न मानला जातो.

Tags: nana patolepresident of maharashtra pradesh congress committeeकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदनाना पटोले
Previous Post

भाजपचे महाराष्ट्रात महावितरण आणि महाआघाडीविरोधात आंदोलन, कार्यालयांना ठोकले टाळे

Next Post

“राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी रहावी”

Next Post
ajit dada

“राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात 'आदर्श मॉडेल' म्हणून उभी रहावी”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!