Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी रहावी”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

February 5, 2021
in सरकारी बातम्या
0
ajit dada

मुक्तपीठ टीम    

 

राज्यातील नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शुद्ध, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी दिले गेले पाहिजे. नागरिकांना पाणी देत असताना त्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी रहावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्‍त केली.

 

पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

ajit pawar

वडगाव बुद्रुक (पुणे) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ संजय चहांदे, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. पुण्याच्या वैभवात भर पाडणारी वास्तू म्हणून उभारणी झाली पाहिजे, असे म्हणत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून दर्जेदार यंत्रणा उभी राहत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जनतेची तहान भागविण्याचे काम केले जाते. राज्यातील जनतेला शुद्ध, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्याचे काम राज्य शासनाच्यावतीने सुरु आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच राज्यातील सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Ajit dada

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ मधील तरतुदीनुसार पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व जनतेला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य पाणी तपासणी प्रयोगशाळेचे महत्त्वाचे योगदान असणार आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व उप विभागीयस्तरावर आजमितीस १७५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रयोगशाळेत प्रथमच जड, विषारी धातू, कीटकनाशके, किरणोत्सारी यासारख्या घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.  राज्यस्तरीय प्रयोगशाळा ही पाणी गुणवत्तेसाठी शिखर संस्था असण्याबरोबरच राज्यासाठी संदर्भ संस्था म्हणून काम पाहणार असल्याचेही सांगितले.

 

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणी गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिकाची तसेच सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजनेची पाहणी करुन माहिती घेतली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांनी मानले.

Ajit dada


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarअजित पवार
Previous Post

अखेर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

Next Post

कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व; कर्णधार जो रुटने झळकवले विक्रमी शतक

Next Post
joe Root

कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व; कर्णधार जो रुटने झळकवले विक्रमी शतक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!