Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी सरकारला जाब विचारल्यामुळेच सोनिया गांधी आणि राहुल गांधींची ईडीकडून चौकशी! : नाना पटोले

July 28, 2022
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने दूध, दही, तेल, तुप, खाण्यापिण्याच्या पदार्थांसह सर्वच वस्तुंवर जीएसटी लावल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा जनतेलाच भोगावा लागणार आहे. जीएसटी, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना या मुद्द्यांवर काँग्रेस व सहयोगी पक्ष संसदेत आवाज उठवू पाहत आहेत म्हणून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खोट्या प्रकरण उकरून काढत सोनियाजी गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी ईडीने चौकशीला बोलावल्यामुळे राज्यभर आजही सत्याग्रह करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्याग्रह करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, नवी मुंबई काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल कौशिक, संतोष शेट्टी, महेंद्र घरत, आ. दिप्ती चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ईडी, सीबीआय सारख्या संस्था मोदी सरकारच्या काळात स्वतंत्र राहिलेल्या नाहीत, या संस्थांना मोदी सरकारने बाहुल्या बनवले आहे व ते सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद अधिवेशन सुरु असल्याने जीएसटी, अग्निपथ योजनेवर काँग्रेस चर्चेची मागणी करत आहे पण मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांना लोकसभा व राज्यसभेतून निलंबित केले जात आहे. सोनियाजी व राहुलजी जनतेचा आवाज उठवत आहेत म्हणूनच घाबरून केंद्र सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात काँग्रेस देशभर शांततेत सत्याग्रह करत आहे पण हे आंदोलनही पोलीस बळावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्यासह ५७ खासदारांना पोलिसांनी दिल्लीत सत्याग्रह करताना ताब्यात घेऊन दिवसभर डांबून ठेवले. भाजपा सरकार हे ब्रिटीश सरकारपेक्षा जास्त अत्याचारी आहे. काँग्रेसने शांततेत सत्याग्रह करून जुलमी ब्रिटीश सत्तेला देशातून पळवून लावले केंद्रातील भाजपा सरकारही पळ काढेल हे नक्की.

सोनिया गांधी आजारी असतानाही चौकशीची नावाखाली त्यांचा छळ केला जात आहे म्हणून केंद्रातील जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही नवी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नांदेडसह राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी सत्याग्रह करण्यात आला.


Tags: INCModi govtnana patoleNational Herald caserahul gandhiSonia Gandhiनाना पटोलेमोदी सरकारराहुल गांधीसोनिया गांधी
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्वाचे निर्णय

Next Post

ओबीसींना मिळालं आणि गेलंही! आधी जाहीर झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना!

Next Post
sc

ओबीसींना मिळालं आणि गेलंही! आधी जाहीर झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!