Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

देशाच्या GDP चे वाट्टोळे करून मोदी सरकार DP बदलायला सांगत आहे – नाना पटोले

काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला राज्यात प्रारंभ

August 10, 2022
in घडलं-बिघडलं
0
nana patole ttack on pm modi

मुक्तपीठ टीम

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला ‘भारत छोडो’ जनआंदोलनाचा नारा दिला त्यावेळी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या आंदोलनात भाग घेतला नाही. जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरोधात लढत होता ते जे लोक इंग्रजाच्या बाजूने लढत होते आज देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना राष्ट्रभक्तीचा उमाळा आला आहे परंतु त्यांचे हे राष्ट्रप्रेम बेगडी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आझादी गौरव पदयात्रेत सेवाग्राम येथे सहभाग घेतला, त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्यांशी संबंधित कोणताही पक्ष वा संघटना यांनी सहभाग घेतला नाही. देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला होता. महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा नारा दिला होता त्यावेळी इंग्रजांनी गांधींची, पंडीत नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले होते. पण देशातील सामान्य जनतेने हे आंदोलन हाती घेतले. अरुणा असफ अली या तरूणीने ऑगस्ट क्रांती मौदानात तिंरगा फडकवला. काँग्रेस पक्षाचे लाखो कार्यकर्ते चले जावो आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाचे या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे. तिरंग्याखाली देश एक झाला असताना भाजपाची मातृसंस्था आरएसएस यापासून दूर राहिली. आज देशाचा जीडीपी घसरला आहे पण तो सावरण्याऐवजी डीपी बदलण्याला मोदी सरकार प्राधान्य देत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सोवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाग्राम येथून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चंदोरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संगमनेर शहरात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक संगमनेर शहरातून आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात केली आहे. सर्वसमावेशक भारत घडविण्यात काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. आजादी गौरव यात्रेच्या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण आणि गेल्या ७५ वर्षात देश उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने आम्ही राज्यभर आजादी गौरव पदयात्रा काढली आहे.

काँग्रेसचे अधिवेशन, स्वातंत्र्याचा लढा, चलेजाव चळवळ यामध्ये संगमनेरच्या मातीतील स्वातंत्र्य सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्या सर्वांचे स्मरण लढाईला बळ देते. स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी १९४७ मध्ये संगमनेर मध्ये ऐतिहासिक अशोक स्तंभाची पायाभरणी करण्यात आली, त्याचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांचा यथोचित सन्मान केला आणि या लोक लढ्यातील वीरांच्या योगदानाला वंदन करण्यात आले.

साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, परभणीमध्ये विधानसेचे मुख्य प्रतोद आ. सुरेश वरपुडकर, धुळ्यात प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, नांदेड मध्ये विधानपरिषदेतील गटनेते आ. अमर राजूरकर, बुलढाण्यात AICC सचिव हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुल बोंद्रे, अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखेडे, मा. आ. विरेंद्र जगताप, नागपूरमध्ये माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, विलास मुत्तेमवार, पुणे जिल्ह्यात माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, चंद्रपूरमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धोटे, आ. प्रतिभा धानोरकर यांनी पदयात्रेत सहभाग घेतला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही आजपासून आझादी गौरव पदयात्रेला प्रारंभ झाला असून १४ तारखेपर्यंत ही पदयात्रा सुरु राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष बुलढामा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित आझादी गौरव यात्रेत शेगाव येथून सहभागी होणार आहेत.


Tags: CongressgdpModi govtnana patoleआझादी गौरव पदयात्राकाँग्रेसनाना पटोलेमोदी सरकार
Previous Post

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फक्त २ कोटी २३ लाखांची संपत्ती! नावावर जमीन नाही, होती तीही दान केली!!

Next Post
PM Modi's total assets Rs 2.23 crore

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फक्त २ कोटी २३ लाखांची संपत्ती! नावावर जमीन नाही, होती तीही दान केली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!