Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 10, 2022
in सरकारी बातम्या
0
Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक  बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन तसेच जिल्ह्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशात प्रथमच सर्वोच्च पदावर आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत; ही बाब आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. राज्यात १ कोटी ५ लाख आदिवासी बांधव असून त्यांच्या प्रगतीवर शासन विशेष लक्ष देत आहे. आदिवासी समाजाचा राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनामध्ये राज्यातील १६ जिल्हे ६८ तालुके ६ हजार २६२ गावांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रम शाळांमध्ये समूह योजनेअंतर्गत निवास, शिक्षण, भोजनासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ५५६ अनुदानित आश्रम शाळेतून जवळपास २ लाख ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय ४९४ शासकीय वसतीगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था करून देण्यात आली आहे. १७३ नामांकित निवासी शाळेच्या माध्यमातून ५३ हजार ३५३ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या माध्यमातून जवळपास २१ हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आदिवासी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथे खासगी संस्थांच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


Tags: Cm Eknath ShindeMaharashtraTribals Communityआदिवासी बांधवमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

“राज्यातील ED सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, मात्र बुलेट ट्रेनवर ६ हजार कोटींची उधळपट्टी”

Next Post

देशाच्या GDP चे वाट्टोळे करून मोदी सरकार DP बदलायला सांगत आहे – नाना पटोले

Next Post
nana patole ttack on pm modi

देशाच्या GDP चे वाट्टोळे करून मोदी सरकार DP बदलायला सांगत आहे - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!