मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदी स्वत:चं पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप करत असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोमवारी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. या टीकेला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून नाना पटोले यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचा बाण सोडला आहे.
काय म्हणाले पटोले?
- कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते.
- उलट काँग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे. रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता.
रेल्वे तुम्हीच सुरु केलीत. - उत्तर प्रदेशमधील गंगेतील प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आलं नाही, हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जातायेत.
- नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त वाटतात.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशिलतेची हद्द पार केली आहे.
- आमच्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप करत होते.
- पण नमस्ते ट्रम्प कोणी केलं.
- तबलिकी समाजाला अधिवेशन कोणी घ्यायला लावलं याची उत्तरं द्या.
भाजपाला पाच राज्यांच्या निवडणूकीत अपयश, त्यामुळेच असे आरोप…
- लॉकडाऊन सुरु केलं तेव्हा रेल्वे, बस बंद केल्या होत्या.
- भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं तेव्हा जे लोकांचे हाल झाले तेच हाल लॉकडाऊन मध्ये झाले आहेत.
- महिनाभर लोकांकडे रोजगार नव्हता, पैसे नव्हते.
- त्यावेळी माणूसकीचं जे नातं जोपासायला हवं होतं ते काँग्रेसनं निभावलं होतं.
- या कामासाठी शाबासकी द्यायला हवी.
- गोव्यात साडेआठहजार लोक विनाऑक्सिजन मरण पावले.
- भाजपाच्या लोकांना तिथे उभं करत नाही.
- देशात कोरोना मृत्युचं तांडव जे पहायला मिळालं ते मोदींच्या चूकीच्या नियोजनामुळे पहायला मिळालं.
- भाजपा उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूकीत पराभूत होतंय, त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप लावले जातायेत.