मुक्तपीठ टीम
आता हिवाळा सुरू होईल. या हंगामात सुट्ट्याही असतात. मोठ्या संख्येने पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एखादी टूर काढण्याचा विचार करतात. जर तुम्ही हिवाळ्यात हिमाच्छादित पर्वतांमध्ये फिरण्याची योजना करत असाल तर नैनितालचा नक्कीच विचार करा. कोणत्याही शांत सुंदर गारेगार ठिकाणाच्या पर्यटन शौकिनासाठी नैनिताल एक मस्त ठिकाण असू शकते. उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र आहे.
या हिवाळ्याच्या हंगामात नैनीतालच्या डोंगर दऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी आयआरसीटीसी चांगली टूर पॅकेजेस देत आहे. नैनितालच्या या ३ दिवस आणि ४ रात्रीच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला २०,२४० रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला हॉटेलमधील मुक्काम, पिकअप आणि ड्रॉप, रात्रीचे जेवण या सर्वांची सोय केली जाईल.
आयआरसीटीसीद्वारे नैनीताल टूर पॅकजचे आयोजन
- लखनौ रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून पर्यटकांना घेतल्यानंतर नैनीतालचा दौरा कारने सुरू होईल.
- वाटेत भीमताल येथे प्रवाशांना विश्रांती देण्यात येईल.
- रात्रीच्या विश्रांतीनंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी मुक्तेश्वरच्या दर्शनासाठी निघतील.
- मुक्तेश्वर मध्ये, प्रवासी भोवली, चोली की जेल, घोराखाल मंदिर आणि चहाच्या मळ्यासारख्या ठिकाणी भेट देतील. भीमतालमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी नैनीतालला फिरायला जातील.
- नैनीतालमध्ये, पर्यटक सत ताल, नौकुचिया ताल, लव्हर पॉईंट आणि नैना देवी मंदिराला भेट देतील.
- यासह, प्रवासी स्वतःच्या खर्चाने नैनी तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.
- याशिवाय पर्यटक संध्याकाळी मॉल रोडचाही आनंद घेऊ शकतात.
- रात्री पु्न्हा, प्रवासी भीमताल येथे विश्रांती घेतील. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर प्रवासी लखनौला रवाना होतील.
या टूर पॅकेजला खर्च किती येणार?
नैनीतालच्या या ३ दिवस आणि ४ रात्रीच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला २०,२४० रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला हॉटेलमधी
ल मुक्काम, पिकअप आणि ड्रॉप, रात्रीचे जेवण या सर्वांची सोय केली जाईल.
पाहा व्हिडीओ: