Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूरातील वेश्यांची वस्ती हडपण्याचं बिल्डरांचं कारस्थान?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nagpur

मुक्तपीठ टीम

नागपुरातील २०० वर्ष जुनी वेश्या व्यवसाय चालत असणारी वस्ती बंद करण्यात आली आहे. नागपुरातील पोलिसांनी या वस्तीतील काही परिसर सील केला आहे. मात्र प्रशासनाच्या निर्णयामुळे वस्तीतील महिला आक्रमक झाल्या असून त्याविरोधात त्यानी आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोलिसांनी कलम १४४ सीआरपीसी अतंर्गत लावलेल्या या परिसरातील बॅरिकेट्स काढून टाकल्या आहेत.

 

तक्रारींमुळे बॅरिकेटिंगचा पोलिसांचा दावा

  • शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गंगा जमुना परिसर बुधवारी संध्याकाळी सील करण्यात आला.
  • येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात, अशी तक्रार सांगितली गेली.
  • कोरोना काळात या परिसरात नियमांचे पालन केले जात नाही, अशाही तक्रारी आल्याचा दावा पोलिसांनी केला.
  • त्यामुळे या वस्तीची नाकेबंदी करण्यासाठी कलम १४४ सीआरपीसी अतंर्गत बॅरिकेटिंग करण्याची कारवाई करण्यात आली.

 

बॅरिकेटिंगमागे बिल्डरांचा हात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक वेश्यांना घोषणा दिल्या.
  • काही महिलांनी या भागात प्रवेश रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेट्स काढले.
  • ज्वाला धोटे यांनी आरोप केला की, पोलीस या भागात बॅरिकेट्स लावून जमीन हडप करण्यात बिल्डरला मदत करत आहेत.

 

गंगा जमुना परिसरात सुमारे ५०० ते ७०० वेश्या राहतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या भागात असलेल्या बहुतेक वेश्या या बाहेरच्या आहेत. परिसरात अनधिकृत बांधकामं झाली आहेत, ज्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. बहुधा या कारवाईच्या माहितीमुळेच पोलिसांवर बिल्डरांच्या फायद्यासाठी वेश्यावस्तीच्या नाकेबंदीचा आरोप होत असावा. स्थानिक समाजसेवकांना विश्वासात घेऊन वेश्यांशी संवाद साधत पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलण्याची गरज होती, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Tags: nagpur policeNCPज्वाला धोटेनागपुर पोलीसराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता, टेन्शन का भारताला?

Next Post

महाराष्ट्राचं लाडकं पुण्याचं सुप्रसिद्ध ‘शौकीन’ मुंबईकरांच्या सेवेत दादरमध्ये!

Next Post
महाराष्ट्राचं लाडकं पुण्याचं सुप्रसिद्ध ‘शौकीन’ मुंबईकरांच्या सेवेत दादरमध्ये!

महाराष्ट्राचं लाडकं पुण्याचं सुप्रसिद्ध ‘शौकीन’ मुंबईकरांच्या सेवेत दादरमध्ये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!