Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूर पोलिसांच्या वर्दीतील माणूस… स्वत: भरला रिक्षा चालकाचा दंड…मुलाची पिग्गी बँक परत!

August 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
nagpur police

मुक्तपीठ टीम

नागपूर पोलिसांच्या वर्दीत दडलेला संवेदनशील माणूस सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आहे. घटना आहेच तशी. नागपूरच्या एका रिक्षा चालकाला वाहतूक पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडले होते. त्याला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. रिक्षा चालकाची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या मुलाची पिग्गी बँक वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेली आणि दंड जमा करण्याचा प्रयत्न केला.

 

वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय मालवीय यांनी नागपुरातील सीताबुल्डी परिसरात रहदारीचे नियम मोडल्याबद्दल रोहित खडसे नावाच्या रिक्षा चालकाला २००० रुपयांचा दंड ठोठावला. पोलिसांनी रिक्षा जप्त करून दंडाची रक्कम जमा करण्यास सांगितले. यानंतर चालक घरी गेला आणि आपल्या मुलाची पिग्गी बँक घेऊन अजय मालवीय यांच्यासमोर पोहोचला.

 

पोलिसांनी पिग्गी बँक परत केली, दंड स्वत: भरला!

  • रिक्षा चालक रोहितचा उदास चेहरा आणि त्याच्या हातात पिग्गी बँक पाहून, जेव्हा अधिकाऱ्याने पिग्गी बँक आणण्याचे कारण विचारले, तेव्हा रोहितने सांगितले की, पैसे नसल्यामुळे मुलाची पिग्गी बँक आणली.
  • यावर पोलीस अधिकारी अवाक झाले आणि त्यांनी रिक्षा चालकाचा दंड स्वतःच्या पैशाने भरला.
  • एवढेच नाही तर त्यांनी रिक्षाचालकाच्या मुलाला बोलावून त्याची पिग्गी बँक परत केली.
  • आता लोक पोलीस अधिकारी अजय मालवीय यांचे खूप कौतुक करत आहेत.
  • नागपूर पोलिसांनीही सोशल मीडियावर हे शेअर केले आहे.

 

रोहितची रिक्षा का झाली होती जप्त?

  • रिक्षा चालकाने रिक्षा नो पार्किंगमध्ये उभी केली होती, त्यामुळे त्याला २०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
  • तपासादरम्यान असे आढळून आले की रोहितच्या नावावर आधीच दोन हजार रुपयांचे चलान होते.
  • त्यामुळे त्याची रिक्षा जप्त करण्यात आली.
  • तो पाच, दहा रुपयांची नाणी आणि काही नोटा घेऊन चलान भरण्यासाठी आला होता.
  • चलान भरण्याबरोबरच त्यांनी भविष्यात असे काही करणार नाही आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करेल असे वचन दिले.
  • पण तो मुलाच्या पिग्गी बँकमधून दंड भरत असल्याचं कळताच पोलिसांमधील माणूस जागा झाला.

Tags: nagpur policepiggy bankनागपूर पोलीस
Previous Post

कोकणाला नारळ उद्योग केंद्र बनवण्याचं नारायण राणेंचं लक्ष्य!

Next Post

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता, टेन्शन का भारताला?

Next Post
Taliban

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता, टेन्शन का भारताला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!