Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रंगतदार लोकनृत्य आणि हस्तकला वस्तूंची रेलचेल, ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याची वाढली बहार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Orange City Craft mela

मुक्तपीठ टीम

नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या २८व्या ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोक नृत्य समारंभाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षी प्रवेशद्वार आणि मंच सजावट ग्रामीण संस्कृतीवर आधारित आहे. पारंपारिक भारतीय घरांच्या अंगणाप्रमाणे अंगण संकल्पनेवर याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे संचालक मंडळाचे सदस्य आनंद कसबे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय रांगोळी आणि पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत ग्रोते, माजी निबंधक अरविंद पाटील यांनी दीपप्रज्वलन करून केला. संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून बहारदार लोकनृत्यांचा आविष्कार सुरु झाला. पौर्णिमा चव्हाण आणि त्यांच्या सहकलाकारानी गणेश वंदना सादर करून याची सुरवात केली. त्यानंतर गोटिपुआ नृत्य (सत्यपिरा पलाई आणि समूह, ओडिसा), राई नृत्य (पद्मश्री. रामसहाय पांडे आणि समूह, मध्य प्रदेश), पंथी (पद्मश्री राधेश्याम बारले आणि समूह, छत्तीसगढ़), छपेली (प्रकाश बिष्ट आणि समूह, उत्तराखंड), बिहु (गिरीराज आणि समूह, आसाम), लावणी (पौर्णिमा चव्हाण आणि समूह, मुंबई, महाराष्ट्र) आणि चकरी (शिवनारायन आणि समूह, राजस्थान) यांच्या नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. व्यवस्थापन आणि लेखा अधिकारी दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

या मेळ्याला रविवारी संध्याकाळी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. केंद्र परिसरात सर्वत्र गर्दी दिसून येत होती. बहुरूपी आणि कच्ची घोडी नृत्याने लहान मुलांना आकर्षित केले, बच्चे कंपनीने यांच्या समवेत फोटोही काढले. क्राफ्ट मेळ्यातून जनतेने हस्तकला वस्तूंची जोरदार खरेदी केली.

 

याचदरम्यान “मुझमें भी कलाकार” या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे.

 

२८वा ऑरेंज क्राफ्ट मेळा, २० मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये दर दिवसासाठी प्रती व्यक्ती ३० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. दुपारी दोन वाजल्यापासून ‘क्राफ्ट मेळा आणि फूड झोन’ मध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो तर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून सांकृतिक कार्यक्रम सादर केले जातात. अधिकाधिक प्रेक्षकांनी या मेळ्याला भेट देऊन आनंद घ्यावा असे आवाहन नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Craft FairFolk DanceFood Zonegood newsHandicraftmuktpeethNagpur South Central Region Cultural CenterOrange City Craft Fairऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाक्राफ्ट मेळाचांगली बातमीनागपूर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रफूड झोनमुक्तपीठमुझमें भी कलाकारलोकनृत्यहस्तकला
Previous Post

लवकरच देशात बारा वर्षांवरील मुलांचं लसीकरण आणि सर्वच ज्येष्ठांना बुस्टर डोस!

Next Post

अॅपलचा स्वस्त 5G आयफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार, १८ मार्चपासून विक्री!

Next Post
IPhone SE

अॅपलचा स्वस्त 5G आयफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार, १८ मार्चपासून विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!