Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून संगीत आणि योगा थेरपी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Music Yog Therapy

मुक्तपीठ टीप 

कोरोनाचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही तर रुग्णांच्या मनावरही होतो. त्यामुळेच अनेक डॉक्टर उपचारांच्या व्यतिरिक्त रुग्णांच्या मनानंही पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत करीत आहेत. रुग्णांना कोरोनाविरूद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यासाठी केवळ वैद्यकीय उपचारच नाहीत तर संगीत आणि योगालाही उपयोगात आणत आहेत.

Music Yog Therapy
मिळेल त्या साधनांचा वापर करत देशाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशीच एक संस्था म्हणजे बंगळुरुची डॉ. चंद्रम्मा दयानंद सागर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँण्ड रिसर्च. या संस्थेच्या रुग्णालयातील कोरोना वॉर्डातील रूग्णांसाठी एक वेगळा प्रयोग केला आहे. रुग्णांना घरी कुटुंबासोबत असल्यासारखं वातावरण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संक्रमित कोरोना रूग्णाच्या मनातील चिंता आणि भीती कमी करण्यासाठी आणि रुग्णाला दुःख आणि नैराश्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि साथीच्या आजाराशी निगडित करण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती प्रणाली बळकट करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रूग्णालयात तपासणी आणि उपचाराशिवाय डॉक्टर स्वत: रूग्णालयात संगीताच्या तालावर इतर कर्मचार्‍यांसह नाचत आहेत. त्यामाध्यमातून ते रुग्णांमध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते रुग्णांना योगाभ्यासाच्या माध्यमातूनही शारीरिकच नाही तर मनोबलही वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Music Yog Therapy

दयानंद सागर विद्यापीठाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य रोहन प्रेम सागर म्हणाले, “जगभरातील वैद्यकीय व्यावसायिक या प्राणघातक विषाणूशी लढा देत आहेत. कोरोनाने प्रत्येकावर मानसिक आणि शरीरावर समान प्रभाव पाडला आहे. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन रुग्णांसाठी कौटुंबिक सदृश वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व काही करीत आहे.संगीत, योगा टिप्सच्या सहाय्याने आम्ही रुग्णांवर कोरोनाचे मानसिक परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते म्हणाले की हा एक इलाज नसला तरी मानसिक पीडेची पातळी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.


Tags: coronamusic yog therapyyogकोरोनायोगा थेरपी
Previous Post

‘सूरताल कराओके सिंगिंग स्टार’ची अंतिम फेरी व निकाल रविवारी

Next Post

पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत गॅसचे एक कोटी कनेक्शन मोफत देण्याची शक्यता

Next Post
pradhan mantri ujjwala yojana

पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत गॅसचे एक कोटी कनेक्शन मोफत देण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!