मुक्तपीठ टीम
अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक ही राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीवर असताना आता नवा ट्विस्ट या निवडणुकीला आला आहे. भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात मुरजी पटेल यांना उतरवण्यात आले आहे. शुक्रवारी भाजपाच्या बड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता मुरजी पटेल यांची उमेदवारी वादात सापडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला असून त्यांच्यावर विविध आरोपही करण्यात आले.
आयोगाने पटेलांचा अर्ज कसा स्वीकारला?
- या निवडणुकीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पर्यायी उमेदवार संदीप राजू नाईक यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती.
- यावेळी त्यांनी उमेदवार म्हणून पटेल यांच्या अर्जावर आक्षेप घेतला.
- पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, आम्ही आज निवडणूक आयोगासमोर ५ आक्षेप घेतले आहेत.
- पहिला म्हणजे, मुरजी पटेल यांना शासनाच्या आदेशानुसार ६ वर्ष निवडणूक लढविता येत नाही.
- त्यांना बाद करण्यात आलं आहे.
- उच्च न्यायालयानेही त्यांना जातीच्या कागदपत्रांमध्ये दोषी ठरवलं आहे.
- तसंच सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केला आहे. मग आयोगाने त्यांचा अर्ज कसा स्वीकारला? असा प्रश्न नाईक यांनी विचारला.
पटेल यांचा मतदानाचा अधिकार आयोगाने अद्याप का काढून घेतला नाही?
- मुरजी पटेल यांना बाद केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागितली.
- मला ज्या तरतुदींनुसार बाद करण्यात आलं होतं, ती तरतुद रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
- त्यावर उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.
- त्यांना तो अर्ज मागे घ्यावा लागला होता.
- या याचिकेचा उल्लेख ही या अर्जामध्ये नाही.
- मुरजी पटेल यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने अद्याप का काढून घेतला नाही? असा प्रश्न नाईक यांनी विचारला.
- जर त्यांचा अधिकार काढून घेतला असेल तर त्याबाबत आम्हाला माहिती द्यावी अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली.
नाईक यांचे पटेल यांच्यावर गंभीर आरोप-
- मुरजी पटेल यांच्यावर बोगस चेक देण्याबाबत खटला आहे.
- तो त्यांनी लपविला आहे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रलंबित खटल्यांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसारित करावी लागते.
- ते ही पटेल यांनी केलेलं नाही.
मग त्यानंतरही त्यांचा अर्ज कसा स्वीकारला?
- एमआयडीसीमध्ये पात्र लोकांच्या घरावर त्यांनी डल्ला मारला आहे.
- कित्येक लोकांना बेघर केले आहे, असा आरोप नाईक यांनी पटेला यांच्यावर केला आहे.