Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोठा दिलासा! मुंबईची हवा इतर महानगरांच्या तुलनेत कमी प्रदूषित!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm2

मुक्तपीठ टीम

देशाची आर्थिक राजधानी मुंबईची हवा दिल्ली आणि अहमदाबादच्या हवेपेक्षा चांगली आहे. ती तुलनेनं कमी प्रदूषित आहे. मुंबईने वर्षभरात विविध स्त्रोतांमधून ४५ गीगाग्राम पार्टिक्युलेट मॅटर पीएम २.५ उत्सर्जित केले, तर दिल्लीने ७७ गिगाग्राम आणि अहमदाबादने ५७ गिगाग्राम पीएम २.५ उत्सर्जित केले. पीअर-रिव्ह्यू आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेवियरमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालातून हे उघड झाले आहे. पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाअंतर्गत सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजेच सफर प्रकल्पाचे काम चालते. सफरचे संस्थापक संचालक डॉ. गुफरान बेग यांच्या टीनने तयार केलेल्या मॉडेलनुसार हे संशोधन झाले आहे.

अर्थात यामुळे मुंबईकरांनी फार आनंदात मश्गूल होऊ नये. कारण एकंदरीतच भारतातील वायू प्रदूषणाच्या धोक्याचा अंदाज या संशोधनावरून लावला जाऊ शकतो. शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेत एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स-२०१९ चा अहवाल प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये ४० टक्के भारतीय नागरिकांना वायू प्रदूषणामुळे ९ वर्षांपेक्षा कमी आयुष्य याचा धोका होता.

 

सफरच्या मॉडेलमुळे तीन दिवसाच्या प्रदूषणाचा अंदाज

  • दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे या चार महानगरांमध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीवर माहिती गोळा करण्यासाठी सफरने एक मॉडेल तयार केले.
  • या मॉडेलचा संशोधन अहवाल प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेवियरमध्ये प्रकाशित झाला आहे.
  • यामुळेच, भारताला जास्तीत जास्त तीन दिवस वायू प्रदूषणाचा अंदाज जारी करण्यात क्षमता मिळाली.
  • हवेत पीएम २.५ ची उपस्थिती घातक आहे कारण यामुळे फुफ्फुसांशी संबंधित रोग होतात.

 

कोणत्या शहरात उत्सर्जनाचे प्रमाण जास्त आहे?

  • सफरच्या संशोधन अहवालानुसार, दिल्लीत वाहतुकीमुळे सर्वाधिक ४१ टक्के पीएम २.५ उत्सर्जन होते.
  • तर मुंबईत ३१ टक्के, अहमदाबादमध्ये ३५ टक्के आणि पुण्यात ४० टक्के पीएम २.५ या स्त्रोतापासून उत्सर्जित होते.
  • मुंबईच्या झोपडपट्टी भागात कचरा आणि इतर गोष्टी मोकळ्या जागी जाळल्यामुळे, जैव इंधन प्रदूषणात पीएम २.५ चे पुरावे जास्त आहेत.
  • पीएम २.५ चे पुरावे मुंबईतील १५ टक्के जैव-इंधन प्रदूषण, दिल्लीमध्ये ३ टक्के, अहमदाबादमध्ये १० टक्के आणि पुण्यात ११ टक्के आढळले आहेत.
  • पीएम २.५ हे पुण्यात सर्वाधिक २२ टक्के औद्योगिक प्रदूषणात सापडले आहे.
  • त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये १९ टक्के, अहमदाबाद १९ टक्के आणि मुंबईत १५ टक्के औद्योगिक प्रदूषण आहे.तुमची साधी कार कशी होऊ शकते ई-कार?

पाहा व्हिडीओ: 


Tags: AhmedabaddelhimumbaiSafarअहमदाबाददिल्लीमुंबईसफर
Previous Post

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा पराक्रम, हिमशिखरावर तिरंगा फडकवला!

Next Post

चला दर्शनाला चला…माळवा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी विशेष ट्रेन सेवा पुन्हा सुरू!

Next Post
gnm 3

चला दर्शनाला चला...माळवा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी विशेष ट्रेन सेवा पुन्हा सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!