Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुंबई विद्यापीठाची दूरस्थ शिक्षण प्रणाली इतरांनी आदर्श घ्यावा अशी!”

March 18, 2021
in सरकारी बातम्या
0
mumbai university

 मुक्तपीठ टीम

          

राज्यात दूर व मुक्त अध्ययन सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ असून या संस्थेच्या वैशिष्ट्यांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षात १८ हजार ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त १५ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

            

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणालीतून  ६४ हजार विद्यार्थी शिकत आहेत. सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शासनाच्या वतीने करण्यात येईल. यात दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ ही योजना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही एक चळवळ निर्माण होण्यासाठी विद्यापीठांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल. असेही  सामंत यांनी यावेळी सांगितले.

            

मुंबई विद्यापीठाच्या या पदवी वितरण समारंभात विविध शिक्षणक्रमातील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयडॉलच्या १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. शाखानिहाय पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या – मानव्य विद्याशाखा-४७००, वाणिज्य विद्याशाखा- १३००३, विज्ञान व तंत्रज्ञान-३८८-कौशल्यविकास विद्याशाखा २३० – एकूण १८३२१ पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या आहे.

            

या कार्यक्रमाला पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रविंद्र  कुलकर्णी, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर आयडॉल संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी प्रास्ताविक केले.

 

यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी देखील आयडॉलमधून एम.ए.अभ्यासक्रमातून विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली. त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.


Tags: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतमुंबई विद्यापीठ
Previous Post

“सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांतून मांजरा-तेरणाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक”-अमित देशमुख

Next Post

आता म्हाडा, गृहनिर्माण संस्था व विकासक यांच्यात त्रिपक्षीय करार बंधनकारक

Next Post
म्हाडा

आता म्हाडा, गृहनिर्माण संस्था व विकासक यांच्यात त्रिपक्षीय करार बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!