Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांतून मांजरा-तेरणाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक”-अमित देशमुख

March 18, 2021
in सरकारी बातम्या
0
मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समन्वय समितीची बैठक 1

 

मुक्तपीठ टीम

 

 

येणारा उन्हाळा लक्षात घेता मांजरा आणि निम्न तेरणा धरणातील पाण्याचे आवर्तन सुरळित राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, संबंधित महसूल तसेच पोलीस यंत्रणा आणि जलसंपदा विभागाने एकत्रितपणे  पाण्याच्या योग्य वितरणाची जबाबदारी पार पाडावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

 

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समन्वय समितीची बैठक झाली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार  धिरज देशमुख, सुरेश धस, अभिमन्यू पवार, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, नमिता मुंदडा, समन्वय समितीचे सदस्य बजरंग सोनवणे, ललित भाई शहा यांच्यासह लातूर महापालिका आयुक्त अमन मित्तल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता आणि प्रशासक अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे, उपविभागीय अभियंता एस जी कोगे तसेच महसूल आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

देशमुख म्हणाले की, येत्या उन्हाळ्यात मांजरा आणि निम्न तेरणा धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते हे लक्षात घेता पाणी वितरणाचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे. मांजरा आणि निम्न तेरणा धरणामध्ये साठलेल्या गाळामुळे धरणाची साठवणक्षमता कमी झाली आहे. हे लक्षात घेता या दोन्ही धरणांमधील गाळाचे सेटेलाईट इमेजेसच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात यावे.                     

 

 ज्या शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेण्यात यावेत आणि मागणीनुसारच पाणी सोडण्यात यावे. कालव्यातून अनधिकृतपणे घेण्यात येणारे पाणी थांबविण्यात यावे.

            

 

 जलसंपदा विभागात पाणी वितरणाच्या कामासाठी अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सध्याच्या परिस्थितीत आऊट सोर्सिंग करुन हे काम करण्यात यावे.

           

 

सध्या मांजरा धरणात १२८.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातील कालव्यांच्या साठ्यावर  ४९५०  हेक्टर, जलाशयावर ३९०० हेक्टर, मांजरा नदीवरील आठ बंधाऱ्यांवर ३ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन करावयाचे आहे. तसेच पाणीपुरवठा आणि औद्योगिक वापरासाठी १४.५ दशलक्ष घनमीटर पाणी राखून ठेवण्यात आले आहे. निम्न तेरणा धरणामध्ये ६८.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून यापैकी २ दशलक्ष घनमीटर पाणी बिगर सिंचनासाठी राखून ठेवण्यात आले आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


Tags: amit deshmukhmuktpeethsanjay bansodeअमित देशमुखपाणी पुरवठा योजनामुक्तपीठसंजय बनसोडे
Previous Post

पुणे महानगरपालिकेत १२४ जागांसाठीच्या भरतीची आज शेवटची तारीख

Next Post

“मुंबई विद्यापीठाची दूरस्थ शिक्षण प्रणाली इतरांनी आदर्श घ्यावा अशी!”

Next Post
mumbai university

"मुंबई विद्यापीठाची दूरस्थ शिक्षण प्रणाली इतरांनी आदर्श घ्यावा अशी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!