मुक्तपीठ टीम
देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणास काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली आहे. या लसीचा उपभोग घेण्यासाठी को-विन अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, “काही हॅकर्स लोकांना त्यांच्या मोबाइलवर एक बनावट लिंक (www.enrolforvaccination.com) पाठवित आहेत, आणि या लिंकवर रजिस्टर केल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भाग घेता येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या बनावट लिंकवर रजिस्टर केल्याने संबंधित व्यक्तीची महत्त्वाची आणि गोपनीय माहिती वापरुन ऑनलाइन फसवणूक केली जात आहे”.
सध्या कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ आघाडीच्या आरोग्य सेवकांचे लसीकरण केले जात असल्याचे मुंबई पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी, “लसीसाठी नागरिकांची नोंदणी करणारी कोणतीही सरकारी वेबसाइट नाही आहे” असे सांगितले आहे.
A Dose Of Danger
There is no government website registering citizens for COVID vaccine.
Only frontline healthcare workers are being vaccinated in the current phase.
So if you are not one & someone offers you the ‘vaccine’, know that it’s a fraud.
Don’t take the #DoseOfDanger pic.twitter.com/hJ8NfVfrUt
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 1, 2021
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी एस. चैतन्य म्हणाले की, “फसवणुकीच्या घटनांना कोणीही बळी पडू नये. कोणी लसीची ऑफर करत असल्यास ती फसवणूक आहे हे लक्षात घ्या”.