Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईची मुलगी…रायगडातील गावकऱ्यांच्या लसीकरणाची व्यवस्था!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
1
vaccination

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या १६ वर्षीय तरूणीनं अलिबागमधील गावकऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतल्याची ही बातमी सर्वात मोठी चांगली बातमी आहे. मुंबईची ही आपली मुलगी म्हणजे नंदिनी कटारिया. ती राहते चर्चगेटला. ताडदेवच्या हील स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिने पुढाकार घेऊन गावकऱ्यांचं लसीकरण केल्यानं सध्या तिचं चौफेर कौतुक होत आहे.

 

vaccination

नंदिनीच्या कुटुंबाचा रायगडच्या अलिबागमधील धोकावडे गावात हॉलिडे होम बंगला आहे. ती तेथे १४ जून गेली तेव्हा त्यांनी बंगल्यातील कर्मचाऱ्यांचे स्वखर्चानं लसीकरण केले. तेव्हाच नंदिनींने कर्मचार्‍यांकडून गावात लसींची कमतरता निर्माण झाल्याची तक्रार ऐकली. तिने घरच्यांशी बोलून योजना आखली. त्या गावातील इतर श्रीमंत बंगला मालकांकडून १२ लाख जमवण्यात आले. त्या पैशातून मुंबईच्या अपोलो रुग्णालयाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेसाठी नंदिनीने स्थानिक पंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधला.

vaccination

अलिबागमध्ये दुसरे घर असलेल्या कटारिया यांनी आपल्या लेकीला प्रोत्साहन दिले. त्यांनी अलिबागमधील समस्या समजून घेण्यासाठी धोकावडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना समजले १८ ते ४४ वयोगटातील क्वचितच कुणाला लस मिळाली आहे. त्यामुळे कटारियांच्या बंगला असलेल् धोकावडे गावातील आणि अन्य गावांमधीलही बंगला मालकांकडून निधी गोळा करून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच अलिबागमधील अपंग व मानसिकदृष्ट्या दिव्यांग रहिवाशांचेही लवकरच लसीकरण करण्यात येणार आहे.

 

मुंबईची ही सोळा वर्षांची मुलगी. पण तिने हाती घेतलेले काम मोठ्यांनाही अभिमान वाटावं असं आहे!

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbaiNandini Katariyavaccinationअलिबागनंदिनी कटारियामुंबईरायगड
Previous Post

आज राज्यात ९,३३६ नवीन रुग्ण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटलं!

Next Post

फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर, बिल्डरला ६९ लाख व्याज देण्याचे आदेश!

Next Post
Builder

फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर, बिल्डरला ६९ लाख व्याज देण्याचे आदेश!

Comments 1

  1. Mangesh bele says:
    5 years ago

    खूप छान कार्य…

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!