मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या आगामी तिसऱ्या लाटेला आव्हान देयाचे असेल तर जास्तीत जास्त लसीकरण करणे गरजेचे आहे. यामुळेच मुंबई महापालिकेने जागोजागी लसीकरणाला वेग आला आहे. देशातील सर्वात जास्त लसीकरण मुंबई महानगरात झाले आहे. कोविन पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईने आतापर्यंत १ कोटी ६३ हजार ४९७ लोकांना लस मिळाली आहे. यापैकी ७२,७५,१३४ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर २७,८८,३६३ ला दोन्ही डोस मिळाले आहेत.
कोरोना लसीकरणासाठी मुंबईत चौफेर प्रयत्न
- मुंबईत ठिकठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात असल्याची माहिती कोविन पोर्टलमध्ये देण्यात आली आहे.
- मुंबईत लसीकरण करणारी ३२५ सरकारी किंवा मनपाची केंद्रे आहेत, तर १८२ खाजगी रुग्णालये चालवतात.
- गेल्या ३० दिवसात सर्वाधिक कोरोना लसीकरणाची नोंद २७ ऑगस्ट रोजी झाली.
- त्या दिवशी १,७७,०१७ लोकांना लस देण्यात आली आहे.
- त्यानंतर २१ ऑगस्टला १,६३,७७५ डोस आणि २३ ऑगस्टला १,५३,८८१ डोस देण्यात आले, असे कोविन पोर्टलने दर्शवले आहे.
आतापर्यंतची कोरोना रुग्णांची नोंद
- शुक्रवारी मुंबईत ४२२ नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.
- सलग तिसऱ्या दिवशी ४०० पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत.
- आता एकूण कोरोनाचा रुग्णांचा आकडा वाढून ७,४५,४३४ झाला आहे,
- तर मृतांची संख्या १५,९८७ झाली आहे.
- १ आणि २ सप्टेंबर रोजी शहरात लागोपाट ४१६ आणि ४४१ कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहे.
- या वर्षी, मुंबईत ४ एप्रिल रोजी सर्वाधिक ११,१६३ दैनंदिन प्रकरणे नोंदली गेली आहे.
- तर १ मे रोजी सर्वाधिक ९० मृत्यूंची नोंद झाली.