Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत कोरोनाचा वाढता वेग! आठवडाभरात रोज २००हून ७००वर!

घाबरू नका, काळजी घ्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona & bmc

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरामध्ये ७०४ कोरोना रुग्णांची तर १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या आता ४ हजार ५५९ झाली आहे.

तज्ज्ञांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा उल्लेख कोरोनाच्या सुप्त लहरीचे संकेत असा केला आहे. मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई मनपाने युद्धपातळीवर चाचण्या वाढवत असतानाच कोरोना उपचारासाठीच्या कोविड सेंटर्सही सज्ज करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत अशी वाढली कोरोना रुग्णसंख्या…

  • २५ मे २१८
  • २६ मे ३५०
  • २७ मे ३५२
  • २८ मे ३३०
  • २९ मे ३७५
  • ३० मे ३१८
  • ३१ मे ५०६
  • १ जून ७३९
  • २ जून ७०४

मुंबईत चाचणी वाढवण्यास मनपाचे आदेश!

  • मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची गंभीर दखल मुंबई मनपाने घेतली आहे.
  • आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मनपा प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले आहे.
  • चहल यांनी मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी मुंबईत चाचणी वाढवण्यास सांगितले आहे.
  • याशिवाय १२ ते १८ वयोगटातील बालकांना जास्तीत जास्त कोरोना लसीकरण, जम्बो सेंटर पुन्हा सज्ज ठेवणे, खासगी रुग्णालयांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • पावसाळा येत असतानाच कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागासह सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

मुंबईत अचानक कोरोना का वाढू लागला?

  • कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीमागे अनेक कारणे असू शकतात.
  • कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांची गर्दी वाढली आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भेटताना पूर्वीप्रमाणे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही.
  • लोक एकमेकांशी संवाद साधताना मास्कशिवाय दिसतात. त्यामुळे प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे.
  • त्याच वेळी, ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंटचा संसर्ग देखील बहुधा कारणीभूत आहे.
  • आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितले की, सर्वाधिक सक्रिय प्रकरणे मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहेत.
  • मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या एक सुप्त कोरोना लाटेचे संकेत देत आहे, असंही तज्ज्ञांचं मत आहे.

Tags: BMCcoronaMaharashtramumbaiआयुक्त इक्बाल सिंह चहलकोरोनामहाराष्ट्रमुंबईमुंबई मनपा
Previous Post

“निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या!”

Next Post

मुंबईप्रमाणेच देशात इतरत्रही वाढतोय कोरोना! सोनिया गांधींनाही लागण!

Next Post
Corona Cases Rises In India, Sonia Gandhi corona tests positive

मुंबईप्रमाणेच देशात इतरत्रही वाढतोय कोरोना! सोनिया गांधींनाही लागण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!