मुक्तपीठ टीम
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांनी आता नवीन कामगिरी बजावली आहे. किमान 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या क्लबमध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आहेत. आता त्या समुहात मुकेश अंबानींचंही नाव आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींच्या संपत्तीत या वर्षी २३.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आता त्यांची संपत्ती वाढून १००.१ अब्ज डॉलर झाली आहे. मुकेश अंबानी या यादीत ११व्या क्रमांकावर आहेत.
रिलायन्सची शेअर बाजारातही उंच झेप
- शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) ९८.७० अंक म्हणजेच ३.८४ टक्के वाढीसह २६७०.८५ वर बंद झाला.
- कंपनीचे बाजार भांडवल १६,९३,१७०.१७ कोटी रुपये आहे. NSE वर तो ९६.८० अंकांनी म्हणजेच ३.७६ टक्क्यांनी वाढून २,६६९.२० वर बंद झाला.
- पुढील आठवड्यात रिलायन्सचे बाजार भांडवल १७ लाख कोटी रुपयांवर पोहचू शकते.
- फोर्ब्सने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. २०२१ मध्ये रिलायन्स एंटरप्रायजेसचे मालक मुकेश अंबानी सलग १४ व्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. २००८ पासून ते या पदावर आहेत.
100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या अब्जाधीशांची यादी
रँक नाव निव्वळ मूल्य (डॉलर मध्ये) स्त्रोत
- अॅलन मस्क २२२ बिलियन टेस्ला, स्पेस एक्स
- जेफ बेझोस १९१ अब्ज अॅमेझॉन
- बर्नार्ड अर्नॉट १५६ अब्ज LVMH
- बिल गेट्स १२८ अब्ज मायक्रोसॉफ्ट
- लॅरी पेज १२५ अब्ज गुगल
- मार्क झुकेरबर्ग १२३ अब्ज फेसबुक
- सर्जी ब्रिन १२० अब्ज गुगल
- लॅरी एलिसन १०८ अब्ज ओरॅकल
- स्टीव्ह वॉलमर १०६ अब्ज मायक्रोसॉफ्ट
- वॉरेन बफे १०३ अब्ज बर्कशायर हॅथवे
- मुकेश अंबानी १००.६ अब्ज रिलायन्स