मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीमार्फत प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा या पदासाठी एकूण १६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, 1) डीएम/ एमसीएचमध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी डीएनबी किंवा एमडी/ एमएस 2) ३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाईल तर, इतर उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.