Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रतिकूलतेत जिद्दीच्या जोरावर बालगृहातील २०९ विद्यार्थ्यांचे १२ वीच्या परीक्षेत यश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bal sudhar gruh

मुक्तपीठ टीम

राज्यातील बालगृहातील २०९ विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता १२ वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मात करता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या बालकांचे कौतुक केले आहे.

 

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना (चाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते.

 

अनाथ, निराधार बालके, एक पालक असलेली, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले आणि प्रमाणित केलेले, शाळेत न जाणारे बाल कामगार आदींना बालगृहात ठेवले जाते. या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

 

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असे नाही तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येते हे या निमित्ताने बालगृहांमधील बालकांनी दाखवून दिले आहे. या विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची वृत्ती, हुशारी जोखण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केले असून त्यांना अभ्यासाला प्रोत्साहित केले आणि या मुलांनी अविरत मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासाला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या २९० पैकी पुण्यातील बालगृहाच्या मुलीने एकूण ९०.६६ टक्के गुण मिळवत बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

 

राज्यात पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या क्रमांकावर मुंबई असून येथील ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवले आहेत. ८० ते ९० टक्के गुण मिळवलेले ३४ विद्यार्थी आहेत. ७० ते ८० टक्के गुण मिळालेले ८६ विद्यार्थी, ६० ते ७० टक्के गुण मिळालेले ६९ विद्यार्थी तर ६० टक्क्याहून कमी गुण मिळवत उत्तीर्ण झालेले १८ विद्यार्थी आहेत.

 

या सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींचे मंत्री ॲड. ठाकूर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन तसेच आयुक्त राहूल मोरे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकासासाठी शासनाकडून शक्य ती मदत पुरवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.


Tags: Adv. yashomati thakurjuvenile homeचाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉबाल कल्याण समितीबालगृहमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय प्राध्यापक पदावर १६ जागांसाठी भरती

Next Post

महाराष्ट्र भाजपात नेतृत्वबदल: फडणवीस म्हणतात तशी माध्यमांची पतंगबाजी की सत्ता संतुलनाची शाहनीती?

Next Post
bjp (2)

महाराष्ट्र भाजपात नेतृत्वबदल: फडणवीस म्हणतात तशी माध्यमांची पतंगबाजी की सत्ता संतुलनाची शाहनीती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!