Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना परिस्थितीच्या गंभीरतेमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mpsc exam

मुक्तपीठ टीम

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने ११ एप्रिलची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

            राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

            ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

            बैठकीस  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.

            बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यसचिवांनी दिली.

    बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आव्हाडांनी केली होती मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वप्रथम परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये कोरोना गंभीरता वाढत असल्यामुळे असलेली अस्वस्थता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानी घातली होती.

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.


Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनागृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज ठाकरेराज्य सेवा परीक्षा
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

सर्व वायफाय राऊटर्सचा बाप…१ जीबीपीएसचा महावेग!

Next Post
router

सर्व वायफाय राऊटर्सचा बाप...१ जीबीपीएसचा महावेग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!