Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्व वायफाय राऊटर्सचा बाप…१ जीबीपीएसचा महावेग!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
router

मुक्तपीठ टीम

इंटरनेच्या या जगात सर्व गोष्टी विकसीत होत चालल्या आहेत. त्यामध्ये वेगाने बदल घडताना दिसत आहेत. यामुळे व्यवसाय करण्याची पद्धत, वर्क फ्रॉम होमसाठी आणि शिकण्याचे नवे मार्ग उपलब्ध होत आहेत. इतकेच नाही तर, एका क्लिकवर क्रिकेट आणि चित्रपटाचा आनंद घरा बसल्या मिळतो. म्हणूनच, घरातील प्रत्येक सदस्य नेहमीच २ ते ३ वेगवेगळ्या उपकरणांद्वारे इंटरनेटशी जोडलेला असतो. परंतु, याकरिता आपल्या घरात फास्ट वायफाय असणे फार महत्वाचे आहे, नाहीतर प्रत्येकास खूप कमी स्पीड मिळते.

 

वायफाय लावल्यास अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात परंतु, जर चांगली इंटरनेट सुविधा नसेल तर, नेहमीच स्पीडच्या अडचणी निर्माण होतात आणि यामुळे कामात अडथळे येतात. बर्‍याचदा असेही होते की, इंटरनेटस्पीड फास्ट असूनही राउटरमुळे इंटरनेट पोहचत नाही. समजा आपल्याकडे ५०० एमबीपीएसचा प्लॅन आहे परंतु, राउटर केवळ १०० एमबीपीएस पर्यंत स्पीड देत ​​आहे. तर फास्ट इंटरनेट असूनही, केवळ १०० एमबीपीएस स्पीड आपल्यापर्यंत पोहोचेल. आता हे राउटर तंत्रज्ञानाने विकसीत केले आहेत. जर आपण एअरटेल ग्राहक असल्यास त्यांचे नवीन १जीबीपीएस राउटर विनामूल्य मिळवू शकता. एअरटेल केवळ नवीन कनेक्शनद्वारेच नव्हे तर जुन्या ग्राहकांनाही हे राऊटर देत आहे. हे देशातील पहिले असे राउटर आहे जे, १जीबीपीएस पर्यंतची स्पीड देते. हे ड्युअल-बँड आणि फोर अँटीना असलेले एक राउटर आहे आणि त्याच्या मदतीने आपण अल्ट्रा फास्ट इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकता.

 

बहुतेक घरात जुने राउटर इन्स्टॉल केले जात आहेत, ज्यांचे तंत्रज्ञान जुने आहे. अशा राउटरवर अधिक डिव्हाइस कनेक्ट केल्याने इंटरनेटचा वेग कमी होतो किंवा इंटरनेट डिस्कनेक्ट होतो. अशा परिस्थितीत काम करणे फार अवघड होते. यावेळेस एअरटेलच्या १जीबीपीएस प्लॅनमुळे आपली अडचण कमी होईल कारण याद्वारे आपल्याला केवळ वेगवान इंटरनेटच मिळत नाही तर पूर्वीपेक्षा जास्त उपकरणांना जोडता येणारे राउटरसुद्धा मिळत आहे.

 

हे नवीन राउटर स्थापित करण्यासाठी तुम्हाला एअरटेलच्या कस्टमर केअर किंवा थँक्स अॅपवर अर्ज करावा लागेल. काही दिवसात, त्यांचे कर्मचारी तुमच्या घरात नवीन राउटर बसवतील. हे राउटर एअरटेलच्या १जीबीपीएस प्लॅनवर पूर्ण कार्य करते. या प्लॅनमध्ये आपल्याला १जीबीपीएस वेग, अमर्यादित इंटरनेट, अमर्यादित लोकल / एसटीडी कॉल आणि विनामूल्य ओटीटी सदस्यता असे फायदे मिळतील. या व्यतिरिक्त तुम्ही एअरटेल एक्सस्ट्रीम डीटीएच बॉक्सवर ५५० टीव्ही चॅनेल्स आणि १०,००० चित्रपटांचा आनंद विनामूल्य घेऊ शकता.


Tags: airtelmuktpeethWIFI
Previous Post

कोरोना परिस्थितीच्या गंभीरतेमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

Next Post

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल आव्हाडांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार, संवेदना अशाच जाग्या ठेवा!

Next Post
awhad & thackeray

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल आव्हाडांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार, संवेदना अशाच जाग्या ठेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!