मुक्तपीठ टीम
ईडी कारवाईमुळे आर्थर रोड तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका खासदार आणि दोन आमदार आले होते. मात्र तुरुंग प्रशासनाने शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना संजय राऊतांना भेटू दिले नाही. राऊतांना भेटण्यासाठी राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर त्यांची भेट होऊ शकते, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.
आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी एक खासदार आणि दोन आमदार आर्थर रोड जेलमध्ये आले होते. त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे राऊत यांची भेटण्याची विनंती केली. मात्र, तुरुंग प्रशासनाने खासदार आणि आमदारांना संजय राऊत यांची भेट नाकारली आहे. तुरुंग नियमावलीनुसार केवळ कुटुंबीयच त्यांना भेटू शकतात. त्यामुळे त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
८ ऑगस्ट रोजी न्यायालयाने संजय राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊत यापूर्वी ईडीच्या ताब्यात होता. राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली होती. अलीकडेच ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले होते. शिवाय, संजय राऊत यांची प्रकृती लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.