मुक्तपीठ टीम
गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या विमान अपघात प्रकरणात राज्य सरकारने विमानाच्या वैमानिकाला ८५ कोटी रुपयांच्या नुकसानभरापाईची नोटीस पाठवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ओषधे आणि इंजेक्शन घेऊन ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असताना विमान कोसळले. पायलट, ज्याला ८५ कोटी रुपयांचे नुकसानभरपाईचे बिल पाठवण्यात आले आहे, त्याला कोरोना काळात प्रशंसनीय कामगिरी केल्याने कोरोना योद्धा म्हणून संबोधले गेले होते.
पायलटचे नाव कॅप्टन माजिद अख्तर आहे. गेल्या वर्षी, तो त्याच्या सह-पायलटसह रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या कोरोना चाचणीचे नमुने आणि औषधांची खेप घेऊन जात होता. ग्वाल्हेर विमानतळावर लँडिंगदरम्यान त्यांचे विमान कोसळले. ज्या विमानाचा अपघात झाला त्याचे संचालन राज्य सरकार करत होते.
वैमानिक काय म्हणाला?
- ८५ कोटींचे बिल सुपूर्द केल्यावर, पायलटने आरोप केला आहे की आपल्याला विमानतळावरील अडथळ्याची माहिती दिली गेली नाही, ज्यामुळे हा अपघात झाला.
- याशिवाय वैमानिकाने विमान चालवण्यापूर्वी विमा नसल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
- पायलटने सांगितले की त्याला विमा उतरवण्याआधी उड्डाणाची परवानगी कशी मिळाली?
नोटीसमध्ये काय लिहिले आहे?
- वैमानिकाला दिलेल्या नोटीसमध्ये सरकारने म्हटले आहे की, विमानाच्या अपघातानंतर दुरुस्तीसाठी आतापर्यंत सुमारे २३ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
- विमानाची खरेदी किंमत आणि खर्चासह सरकारनेच ८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तुमच्याकडून का करू नये?