Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरु, सध्या आठवड्यातून दोन दिवसच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

देशाता कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळेच अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने येत्या १४ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस सुनावणी चालणार असून पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी झाल्यानंतर परिस्थितीचा विचार केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भौतिक सुनावणीचा निर्णय भारताच्या सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या समितीशी सल्लामसलत करून घेतला आहे.

 

या आदेशात म्हटले आहे की, राजधानी दिल्लीतील कोरोनाच्या प्रकरणात घट आणि पॉझिटिव्ह दरात घट, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि दिल्ली सरकारने ४ फेब्रुवारी रोजी जारी केलेला आदेश लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी स्थगित करण्यात आली होती आणि व्हर्च्युअल सुनावणी सुरू होत्या.

 

आठवड्यातून बुधवारी आणि गुरुवारी होणार प्रत्यक्ष सुनावणी

  • प्रत्यक्ष सुनावणी आठवड्यातून दोनदा होणार आहे.
  • आठवड्यातील बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवशी घेतली जाणार आहे.
  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक कमी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सुधारित मानक कार्यप्रणालीचे पालन करीत न्यायालयीन कामकाज सुरु राहणार आहे.
  • भारताच्या सरन्यायाधीशांनी या संदर्भात इतर न्यायाधीशांशी सल्लामसलत करून प्रत्यक्ष सुनावणीचा निर्णय घेतला आहे.
  • गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे आठवड्याच्या इतर दिवशी हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेतली जाणार आहे.

 

राज्यात कोरोना मंदावतोय….

  • सोमवारी राज्यात ६,४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत तर १८,४२३ रुग्ण बरे झाले आहेत.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७६% एवढे झाले आहे.
  • राज्यात सोमवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
  • राज्यात सोमवारी रोजी एकूण १,०६,०५९ सक्रिय रुग्ण आहेत.

Tags: Actual HearingSupreme Courtप्रत्यक्ष सुनावणीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“मजबूरी नहीं, मजबूती का नाम है महात्मा गांधी!”

Next Post

अरे बाप रे! सरकारने कोरोना योद्धा वैमानिकाला मागितली विमान अपघातासाठी ८५ कोटी नुकसानभरपाई! स्वत: मात्र विमाच भरला नव्हता!

Next Post
Govt demands Rs 83 crore compensation for Pilot Mazid Akhtar

अरे बाप रे! सरकारने कोरोना योद्धा वैमानिकाला मागितली विमान अपघातासाठी ८५ कोटी नुकसानभरपाई! स्वत: मात्र विमाच भरला नव्हता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!