मुक्तपीठ टीम
दिवाळीचा सण म्हणजे अनेक कारागिरांसाठी कमवण्याची संधी. पण सध्या अनेकदा महागड्या वस्तूंच्या क्रेझमध्ये पारंपरिक लोककलांकडे दुर्लक्ष होतं. हेच ओळखून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वेगळा प्रयोग केला. छतरपूर जिल्ह्यातील धामना गावात नेरम प्रजापती यांच्या घरी जाऊन हाताने बनवलेल्या मातीच्या वस्तू पाहिल्या. तेथे त्यांनी स्वतः चाकावर मातीचे दिवे तयार केले.
मुख्यमंत्री चौहान यांनी प्रजापती समाजाने बनवलेल्या मातीचे दिवे व इतर आकर्षक वस्तूंचे कौतुक केले. दिवाळी सणानिमित्त प्रजापती समाजातील लोकांनी मातीचे दिवे आणि वस्तूंचे गिफ्ट हॅम्पर तयार केले आहेत. हे स्थानिक बाजारपेठेत विकले जातील. मुख्यमंत्री चौहानांच्या भेटीमुळे कुंभाराच्या कलेचं मार्केटिंग आपोआपच झालं.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, नोनेलालजींच्या घरी मातीचे दिवे आणि कुल्हड बनवल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती आली. त्यांच्या अफाट प्रेम आणि दयाळूपणाबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी त्या कुंभाराच्या घरी जेवणही केले.
त्यांनी ट्विटमध्ये पुढे लिहले
हटा कृत्रिम दीयों को
बिजली को भी बचाएं
आओ मिलकर हम
इस मुहिम को आगे बढ़ाएं
मिट्टी के हम हैं
मिट्टी से ही प्यार करें
एक छोटासा फर्ज़
इंसानी भी तो निभाएं-निश्छल