Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

द्राक्षात खाल्ला मोठा फटका, लातूरच्या शेतकऱ्याला सिताफळात यशाचा गोडवा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
सीताफळाची लागवड

मुक्तपीठ टीम

संकटं येतात. काहीवेळा तर चहुबाजूने घेरतात. पण हिंमत हरण्याऐवजी त्यांच्याशी सामना केला तर यश मिळवणं शक्य असतं. लातूरच्या बाळकृष्ण येलाले या तरुण शेतकऱ्यांनं द्राक्ष निर्यातीत प्रचंड नुकसानीनंतरही हिंमत हरली नाही. बाजाराचा अभ्यास करून सिताफळाची बाग लावली. आता लक्षावधीची उलाढाल करुन ते सिताफळाचा गोडवा चाखत आहेत.

 

लातूर तसा दुष्काळी भाग. पाण्याची समस्या नेहमीचीच. तरीही शेतकरी तग धरतात, मेहनतीनं कोरड्या मातीत सोनं पिकवतात. जानवळ येथील बाळकृष्ण येलाले हे प्रयोगशील शेतकरी. ते खरे द्राक्षबागायतदार. पण काही वर्षांपूर्वी युरोप खंडात पाठवलेल्या द्राक्षात पेस्टीसाईटचा तांत्रिक दोष दाखवून ते द्राक्ष समुद्रात फेकून दिले… त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. त्यात ‘येलाले’ यांचाही माल होता.. त्यामुळे त्यांनाही लाखोचा फटका बसला. त्यातच त्यांनी द्राक्ष बाग मोडली. या लाखोच्या तोट्यामुळे काय करावं या विवंचनेत ते सिताफळाकडे वळले…!!

 

बाळकृष्ण नामदेव येलाले, तरुण शेतकरी.. शेती आणि शेती मार्केट कोळून प्यायलेले … कमी वयात अधिक अभ्यास करून शेती करणारे… त्यांच्या अनुभवातून त्यांनी सिताफळाची बाग लावली. आज त्यांनी मिळवलेसं यश हे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देतेय. त्यांनी सांगितलेली गोष्ट हजारो शेतकऱ्यांना नवी दृष्टी देऊ शकते. म्हणून त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी केलेला थेट संवाद.

 

सीताफळाचीच लागवड का?

येलाले म्हणाले, ” एन एम के गोल्डन ” या जातीच्या सिताफळाची 2011 ला लागवड केली… या जातीच्या सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळ धारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी देठ सोडत नाही…फळ तोडल्यानंतर 4 थ्या दिवशी तयार होते, एक फळ 500 ते 700 ग्रॅम भरते…लागवडी नंतर फक्त चार वर्षात फळ लागायला सुरुवात होते. जानवळ हा डोंगरी भाग आहे… इथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तापमान अधिक हमखास असते. जानवळचा डोंगर जवळ आहे त्यामुळे रानटी जनावरं मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात. सीताफळाच्या पानाचा उग्रवास असल्यामुळे कोणतेही रानटी जनावर ते खात नाही. अत्यल्प पाणी हवं असलेलं हे फळ आहे. याला जास्त पाणी झालेतर फळ कमी लागते. यावर्षी फूल धारण करतांना सुरुवातीला पाऊस कमी झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळं धरली गेली. आता झाड फळानी लगडले आहेत. येत्या आठ दिवसात याची तोड सुरु होईल.

 

सीताफळ इतर पिकापेक्षा परवडते का?

2011 ला सात एकर क्षेत्रात लागवड केली त्यानंतर आता पर्यंत तीन ते चार सिझन मिळाले… सुरुवातीला तेजी होती म्हणून फार म्हणावा तसा भाव मिळाला नाही.त्यानंतर बाजारपेठेचा अभ्यास झाला दलाला शिवाय स्वतः मार्कटला जाऊ लागलो.. त्यामुळे देशभरातल्या मार्केटचा अभ्यास झाला. सिताफळाला एकरी दरवर्षी खर्च अधिकाधिक 50 हजार होतो. एकरी उत्पन्न 5 ते 10 टन होतं, कमीत कमी 25 रुपये किलोचा भाव मिळतो. मागच्या दोन वर्षात या सात एकर मध्ये 40 लाख रुपयाचे सिताफळ विकल्याचे बाळकृष्ण येलाले सांगतात.

 

आता शासनाचा कृषि विभाग ” विकेल ते पिकेल ” या योजनेखाली प्रोत्साहन देत आहे. सीताफळ या सारख्या फळाला पल्प तयार करणाऱ्या कंपन्या हे मोठे मार्केट आहे.

 

सिताफळ मार्केट

हैद्राबाद, दिल्ली आणि नवी मुंबई ( वाशी ) हे देशातील मार्केट आहेत. यातील सर्वात मोठे मार्केट नवी मुंबई ( वाशी ) येथे आहे. अनेक पल्प तयार करणाऱ्या कंपन्या यातले सर्वात मोठे ग्राहक आहे. त्यामुळे चांगल्या जातीचे थोडे जास्त काळ राहणारे सिताफळ कोरडवाहू शेतीत बागायती शेतीचे उत्पन्न काढू शकतात तेही कमी खर्चात… बघा ज्याला रानटी जनावरं खाणार नाहीत पण माणसं आवडीने खातात ती शेती करा. एक फायद्याच्या शेतीचा उत्तम पर्याय आहे.

 

सिताफळ आरोग्यदायी

सिताफळ वाताळ असते असे म्हटले जाते मात्र एका आंतरराष्ट्रीय न्यूट्रेशन जरनल मध्ये आलेल्या आलिसा पल्लाडिनो यांच्या लेखात उल्लेख केल्या प्रमाणे, सिताफळात उच्च प्रतीचे फायबर असते, व्हिटॅमिन, मिनरल हे घटक तर असतातच त्या शिवाय प्रतिकारशक्ती वाढविणारे असल्यामुळे सिताफळ खाल्यास शरीरातल्या व्याधी मक्स रूपात बाहेर येत असल्यामुळे सर्दी झाल्या सारखे वाटू शकते. डोळे आणि हृदयाला आरोग्यदायी आहे. यातून अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन सी, बी (6) मिळत असल्यामुळे हे पृथ्वीवरलं अमृत म्हणायला हरकत नाही…!!


Tags: balkrushna yelalecustard apple farminglaturmuktpeethदुष्काळग्रस्त भागबाळकृष्ण येलालेमुक्तपीठलातूरसिताफळ शेतीसीताफळाची लागवड
Previous Post

राज्यात नवे रुग्ण १,१७२, तर १,३९९ घरी परतले! २८ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही!

Next Post

कुंभाराच्या घरी मुख्यमंत्र्यांनी बनवले दिवे, आवाहन मातीचे दिवे वापरण्याचे!

Next Post
mp

कुंभाराच्या घरी मुख्यमंत्र्यांनी बनवले दिवे, आवाहन मातीचे दिवे वापरण्याचे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!