Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयुर्वेदासह भारतीय उपचार पद्धतींना जागतिक मान्यता मिळवण्यासाठी महत्वाचं पाऊल

September 5, 2026
in featured, आरोग्य, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
Ayurveda medicine

मुक्तपीठ टीम

आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपथी या भारतीय उपचार पद्धतीचं महत्व शतकानुशतकांपासून भारतात माहित आहे. या औषधांची सुरक्षितता आणि उत्तम गुणवत्ता याबाबत जागतिक पातळीवर विश्वास विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालयाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून एक महत्वपूर्ण पाऊल उचलत भारताच्या फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन  अ‍ॅन्ड होमिओपॅथी आणि अमेरिकन हर्बल फार्माकोपिया यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामुळे अमेरिकन आणि जागतिक बाजारपेठेत या औषधांबद्दल विश्वास बळकट होईल. तसेच त्यांच्या निर्यातीच्या संधी वाढतील.

 

आयुष मंत्रालयाने महत्वाचे पाऊल उचलत यासाठी मार्ग मोकळा केला आहे. यासंदर्भात फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन  अ‍ॅन्ड होमिओपॅथी आणि अमेरिकन हर्बल फार्माकोपिया यांच्यात १३ सप्टेंबर २०२१ला सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दुरदृष्य प्रणालीद्वारे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशात परस्पर लाभदायी आणि समानता या आधारावर आयुर्वेद आणि इतर भारतीय पारंपारिक औषध प्रणालीला प्रोत्साहन, मानक विकास आणि बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाने हा करार केला आहे.

 

या प्रयत्नपूर्वक सहयोगामुळे आयुर्वेद, सिध्द, युनानी आणि होमिओपॅथी औषधांच्या निर्यात संधीत दीर्घकालीन वाढ अपेक्षित आहे.

 

या सामंजस्य करारामुळे आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपथी औषधांविषयी जागतिक समुदायामध्ये विश्वास विकसित होईल अशी आयुष मंत्रालयाची अपेक्षा आहे.

 

अमेरिकेत आयुर्वेद उत्पादने आणि हर्बल बाजार पेठेत सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांवर, पीसीआयएम अ‍ॅन्ड एच आणि एएचपी दोन्ही एकत्रितपणे काम करतील ही या कराराची मोठी फलश्रुती राहील. ही महत्वाची बाब असून आयुर्वेद, सिध्द आणि युनानी तसेच होमिओपॅथी उत्पादने आणि औषधांना अमेरिकी बाजारपेठेसाठी, या सहकार्यातून विकसित आयुर्वेद मानकांचा स्वीकार करण्याला चालना मिळणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातला हा  सामंजस्य करार म्हणजे, आयुर्वेद आणि इतर पारंपरिक भारतीय औषधांची गुणवत्ता देशात आणि जागतिक स्तरावरही बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून सुरु असलेल्या उपक्रमांना, अधिक गती देण्याच्या दिशेने वेळेवर उचललेले पाऊल आहे.

 

सध्याच्या संसर्गाला प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता वाढवण्यामध्ये आयुर्वेद, सिध्द आणि युनानी तसेच होमिओपॅथी औषधांची भूमिका तथ्यावर आधारित आणि प्रशंसनीय आहे. या प्रणालीचा जागतिक स्वीकार आणि प्रोत्साहन याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुष मंत्रालय काम करत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ayurvedaAyush mantralayआयुर्वेदआयुष मंत्रालय
Previous Post

ओला ईलेक्ट्रिक स्कूटरच्या फॅक्टरीत १० हजारांना रोजगार, महिलांच्या हाती सूत्रं

Next Post

‘हेवीवेट’ भारती सिंगनं कमी केलं वजन! गंभीरतेनं घ्याव्या अशा लाफ्टर क्वीनच्या टीप्स!

Next Post
Bharti singh weight loss

'हेवीवेट' भारती सिंगनं कमी केलं वजन! गंभीरतेनं घ्याव्या अशा लाफ्टर क्वीनच्या टीप्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!