मुक्तपीठ टीम
न्यायाधीश हे नेहमी न्याय देयाचे काम करतात पण त्यांच्याकडूनचं काही गैरवर्तन झालं की न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. अशी एक घटना भरतपूरमध्ये घडली आहे. एक न्यायाधीश अल्पवयीन मुलावर दीड महिन्यांपासून बलात्कार करत होते. संबंधित गुन्हा हा भरतपूरमधील मथुरा गेट पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला असून जोधपूर उच्च न्यायालयाने आरोपी न्यायाधीश जितेंद्र गुलिया यांना निलंबित केले आहे.
टेनिस खेळताना भेटलेल्या मुलालाच केले वासनेचं लक्ष्य!
- रविवारी मुलाला त्याच्या आईसह घेऊन मथुरा गेट पोलिस ठाणे गाठले आणि न्यायाधीशांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
- महिलेचे म्हणणे आहे की, दंडाधिकारी दीड महिन्यापासून धमकावून मुलाचा विनयभंग करत होते.
- हा संपूर्ण प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला.
- त्यानंतर त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.
- मुलाचे वय १४ वर्षे आहे.
- तिचा मुलगा डिस्ट्रिक्ट क्लबमध्ये टेनिस खेळण्यासाठी जातो.
- भरतपूरचे अनेक अधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र गुलियाही क्लबला भेट देत असत.
- त्यांनी प्रथम मुलाशी ओळख करून घेतली आणि नंतर त्याला त्याच्या घरी नेण्यास सुरुवात केली.
- एके दिवशी न्यायाधीश जितेंद्र गुलिया यांनी मुलाला त्याच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या कोल्ड ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळले.
- मुलगा बेशुद्ध पडल्यावर त्यांनी त्याच्याशी गैरवर्तन केले.
- एवढेच नाही तर न्यायाधीशांनी मुलासोबत एक अश्लिल व्हिडिओही बनवला.
- मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्याचा अश्लील व्हिडिओ मित्रांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.
- मी तुझ्या मोठ्या भावाला तुरुंगात पाठवीन आणि तुझ्या आईसोबतही चुकीचे कृत्य करेन, असेही सांगितले.
मुलाच्या आईला कसे कळले?
- महिलेने सांगितले की, तिचा मुलगा गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता होता.
- २८ ऑक्टोबर रोजी न्यायाधीश जितेंद्र गुलिया मुलाला सोडण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
- मुलाची आई घराच्या बाल्कनीत उभी होती.
- घरी पोहोचल्यानंतर न्यायाधीशांनी मुलाचा चुंबन घेतला आणि त्याला घराबाहेर सोडले.
- हा सर्व प्रकार मुलाच्या आईने पाहिला, त्यावर आईने मुलाची कडक चौकशी केली.
- मग मुलाने आईला सांगितले की हे लोक खूप भयंकर आहेत.
- तो त्याच्या भावाला कधीही तुरुंगात पाठवू शकतो. आपल्या सर्वांना मारू शकतात.
- पोलिस त्यांच्या इशाऱ्यावर काम करतात.
- हे सांगत तो रडायला लागला.
- न्यायाधीश जितेंद्र गुलिया त्याला दारू पाजत असे. ज्यूसमध्ये काही मादक द्रव्य मिसळून देत.
- त्यानंतर ते कपडे काढून माझ्यासोबत गैरवर्तन करतात.
- हे सर्व करण्यास नकार दिल्यास धमकी दिली.
- मुलाने सांगितले की, न्यायाधीशांसोबत राहणाऱ्या अंशुल सोनी आणि राहुल कटारा या दोघांनीही आपल्यासोबत गैरवर्तन केले आह
पोलिसांनीही मुलाचे घरी जाऊन धमकावले!
- मुलाच्या आईने सांगितले की, जेव्हा त्यांनी मुलाला खेळायला पाठवले नाही, तेव्हा २९ रोजी अंशुल सोनी, राहुल कटारा आणि एसीबीचे सीओ परमेश्वर लाल यादव काही पोलिसांना घेऊन आले.
- घरी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी महिलेला मुलाला न्यायाधीशांकडे पाठवा, नाहीतर तुरुंगात टाकू, अशी धमकी दिली.
- महिलेने मुलाला पाठवण्यास नकार दिल्याने सर्वांनी तिला शिवीगाळ केली.
- यावर आजूबाजूचे लोक जमा झाले.
- यावर सर्व लोक महिलेच्या घरातून निघून गेले.
- रात्री उशिरा न्यायाधीशांनी महिलेला फोन केला आणि मुलाने तिला सर्व काही सांगितल्याचे तिने सांगितले.
माफी मागण्यासाठी घरी आलेल्या न्यायाधीशांचा व्हिडिओ बनवला
- न्यायाधिशांनी ३० तारखेला राहुल कटारा याला बालगृहात पाठवले.
- राहुल कटारा यांनी माफी मागून भविष्यात अशी चूक होणार नसल्याचे सांगितले.
- काही वेळाने अंशुल सोनीही मुलाच्या घरी पोहोचला.
- त्यांनी मुलाची आई आणि मुलाची माफीही मागितली.
- यानंतर दुपारी न्यायाधीश गुलिया मुलाच्या घरी पोहोचले.
- त्यांनी मुलाची माफीही मागितली आणि पुढे अस काही करणार नाही हे सांगितले.
- यादरम्यान मुलाच्या कुटुंबीयांनी न्यायाधीशांची माफी मागणारा व्हिडिओ बनवला, जो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.
- महिलेने सांगितले की, संध्याकाळी एसीबीचे सीओ परमेश्वर लाल यादव त्यांच्या घरी पोहोचले आणि माफी मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या नातेवाईकांना खंडणीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
- मथुरा गेटचे पोलीस अधिकारी रामनाथ गुर्जर यांनी सांगितले की, मथुरा गेट पोलीस स्टेशन परिसरातील एका महिलेने आपल्या मुलासोबत गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला आहे.
- महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या मुलावर सामूहिक बलात्कार झाला आहे.
- मुलाचे वय कमी असल्याने पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सीओ सिटी सतीश वर्मा करीत आहेत.
- या महिलेने न्यायाधीश जितेंद्र गुलिया आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.