Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखिलेश यादवांची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा! ममतांपासून घेतला धडा?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
akhilesh yadav

मुक्तपीठ टीम

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाचा दणदणीत पराभव करून मोठा विजय मिळवला असतानाच ममता बॅनर्जींना मात्र पराभव पत्करावा लागला होता. भाजपाच्या घेराबंदीमुळे तसं घडल्याचं मानलं जातं. त्यापासून धडा घेत अखिलेश यादव यांनी एका मतदारसंघात अडकून पडण्याऐवजी संपूर्ण राज्यांच्या लढतीवर लक्ष देण्यासाठी मोकळं राहण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता आहे.

sp

लॅपटॉप-मोबाइल चालवता न येणारे मुख्यमंत्री!

  • अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तरुणांची विचारसरणी समजत नसल्याबद्दल टोला लगावला आहे.
  • आजच्या युगात ज्या तरुणांना लॅपटॉप आणि मोबाईल चालवायचे हेच कळत नाही अशा तरुणांचे हित कसे समजणार?
  • तरुण हे या देशाचे भविष्य असून तरुणच तरुणांचे मन समजू शकतात.
  • आतापर्यंत आम्हाला माहित होते की, आमच्या मुख्यमंत्र्यांना लॅपटॉप कसा चालवायचा हे माहित नाही, पण आताच एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना मोबाईल कसा चालवायचा हे ही माहित नाही.
  • जरा विचार करा, आजच्या युगात मोबाईल आणि लॅपटॉप चालवता न येणाऱ्या तरुणांना काय समजणार?

sp

भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपा समाजात जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत असल्याचा आरोप करत अखिलेश म्हणाले की, “जगामध्ये भारताची ओळख ही अनेक धर्म आणि जातींचे लोक एकत्र राहण्याची आहे. आमच्याशी संघर्ष करणारी कोणतीही विचारधारा असेल तर ती आम्ही स्वीकारणार नाही”, असेही ते म्हणाले. समाजवादी विचारसरणीचा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या देशाच्या संविधानाचे आपण पालन करतो. असे म्हणत अखिलेश यांनी टोला लगावला.

 

नाव बदलणे भाजपाला आवडते!

अखिलेश यादव पुढे म्हणाले की म्हणाले की, “भाजपची सर्वात आवडती दोन कामे म्हणजे प्रथम वेगवेगळ्या ठिकाणांची नावे बदलणे आणि दुसरे म्हणजे शौचालये बांधणे. ते म्हणाले की, समाजवादी पूर्वांचल एक्सप्रेसवे जो सपा सरकारच्या काळात बांधला जात होता, त्याचे नाव मुख्यमंत्र्यांनी बदलले.
त्याचप्रमाणे, सपा सरकारमध्ये न्यूयॉर्क पोलिसांच्या आधारावर उत्तर प्रदेश पोलिसांची हेल्पलाइन सेवा ‘यूपी १००’ सुरू करण्यात आली. ही अशी सेवा होती की गावातून कोणी फोन केला तर पोलिस त्याच्या मदतीला यायचे. पण मुख्यमंत्री योगी यांनीही त्याचे नाव बदलून ‘डायल ११२’ केले.


Tags: akhilesh yadavAssembly electionsmuktpeethअखिलेश यादवउत्तर प्रदेशमुक्तपीठमुख्यमंत्री अखिलेश यादवसमाजवादी पक्ष
Previous Post

कंगनाचा अंदमान दौरा…स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचं दर्शन…पुन्हा राजकारण प्रवेशाची चर्चा

Next Post

आपल्या अल्पवयीन मुलावर बलात्कार करणाऱ्या न्यायाधीशाला आईनं शिकवली अद्दल! माफीचा व्हिडीओ व्हायरल करून केले गजाआड!!

Next Post
mother nabbed rapist accused judge by viral confession video

आपल्या अल्पवयीन मुलावर बलात्कार करणाऱ्या न्यायाधीशाला आईनं शिकवली अद्दल! माफीचा व्हिडीओ व्हायरल करून केले गजाआड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!