Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव भाऊरायाला कोरोना विधवा भगिनींची आर्त हाक….”घरात दाटला अंधार पाठीशी उभे राहा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
heramb kulkarni

मुक्तपीठ प्रतिनिधी

उद्धव भाऊराया, कोरोनात आमचा घरचा माणूस गेला,दवाखान्यात पैसा ही गेला. कर्जबाजारी झाल्याने शासनाने काहीच मदत केली नाही की  रोजगाराची मदतही केली नाही.. ऐन दिवाळीत आमच्या घरात अंधार दाटला आहे. तुम्ही तरी भाऊराया म्हणून आमच्या पाठीशी उभे राहा अशी आर्त साद कोरोनात विधवा झालेल्या शेकडो महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टकार्ड लिहून केली आहे.. राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी असे पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिगत नावावर पाठवले आहेत….

heramb Kulkarni (1)

त्याच वेळी कोरोना ‘एकल महिला  पुनर्वसन समितीच्या’ कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पेक्षा ५०० पेक्षा जास्त ईमेल करून ५० हजार रुपयांची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने केंद्र सरकारने स्वतंत्र एक लाख रुपये द्यावेत व राज्य सरकारने स्वतंत्र एक लाख रुपये असे दोन लाख रुपये करून विधवांना द्यावेत कारण या महिला दवाखान्याच्या खर्चाने कर्जबाजारी झालेल्या आहेत असे आवाहन केले आहे..

 

त्याच वेळी महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदार यांना भेटून हे कार्यकर्ते निवेदन देत आहेत व केंद्र व राज्य सरकारने दोन लाख रुपये द्यावेत म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा  अशी विनंती करीत आहेत..

heramb Kulkarni (2)

कोरोना विधवांच्या प्रश्नावर इतका पाठपुरावा करून सुद्धा अनेक घोषणा होऊनही अजून कोणतीच योजना या महिलांसाठी अमलात आली नाही..  तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली वात्सल्य समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले परंतु   निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यात अजून समितीच स्थापन झाली नाही. रोजगारासाठी सरकारने अजून काहीच केले नाही. ५० हजार रुपये ची मदत देणे दूरच पण त्याचा साधा शासन आदेश सुद्धा अजून निघाला नाही. यातून या महिलांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे. त्यामुळे या महिलांनी भाऊबीजेसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आर्त साद घातली आहे.

letter

सरकारने कोणतीच आर्थिक मदत केली नाही,रोजगारासाठी तरतूद केली नाही त्यामुळे या महिलांना सरकारच्या दारात उपोषण करण्याची वेळ सरकारने आणू नये असा इशारा कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी दिला आहे…


Tags: cm uddhav thackerayHeramb KulkarniPM Narendra modivijay wadettiwarपंतप्रधान नरेंद्र मोदीपोस्टकार्डमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविजय वडेट्टीवारहेरंबकुलकर्णी
Previous Post

आपल्या अल्पवयीन मुलावर बलात्कार करणाऱ्या न्यायाधीशाला आईनं शिकवली अद्दल! माफीचा व्हिडीओ व्हायरल करून केले गजाआड!!

Next Post

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर! पण आरोप करणारे परमबिर सिंह कुठे?

Next Post
anil Deshmukh

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर! पण आरोप करणारे परमबिर सिंह कुठे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!