मुक्तपीठ टीम
पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. काही महिन्यात राज्यात १२ हजार ५०० पोलीस भरती प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगीत करण्यात आली होती. मात्र आता मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांसमवेत बोलणी केली असून त्यांनी पोलीस आणि वैद्यकीय भरतीसाठी अनुकुलता दाखवली असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगीतले. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने आयोजीत केलेल्या महिला बिट अंमलदार परिसंवाद आणि आढावा बैठकीच्या कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.
पुढे गृहमंत्र्यांनी म्हटले की, पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० आणि दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० अशा पद्धतीने पोलीस भरती केली जाईल. १०८ क्रमांक असलेल्या रुग्णवाहीकेप्रमाणे नागरिकांना पोलीस मदतीसाठी प्रोजेक्ट ११२ ही संकल्पना आणली जाईल. औरंगाबाद येथे या योजनेवर काम सुरु आहे. या संकल्पनेसाठी पोलीस दलासाठी दोन हजार चारचाकी आणि अडीच हजार मोटार सायकल देण्यात येतील. या वाहनांना जीपीएस प्रणाली लावली जाईल.
या कर्याक्रमात कोरोनाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षकांचा राष्ट्रीय महिला आयोगाने ‘कोविड वूमन वॉरिअर’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा कक्षा’चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले आहे.
आज औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. कोरोनाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षकांचा (@spabdr) राष्ट्रीय महिला आयोगाने ‘कोविड वूमन वॉरिअर’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. या कामगिरीबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच पोलीस अधीक्षकांनी (१/३) pic.twitter.com/a8ECBvKVqw
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 30, 2021