Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुत्व संघाशी जोडलेले, सत्तेचा रिमोट संघाकडे नाही! – मोहन भागवत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Sarsanghchalak Mohan Bhagwat

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर हिंदुत्वावर सुरु असलेल्या वादावर विचार मांडले. ते म्हणाले की, संघाकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल नाही, हा आरोप निराधार आहे.
हिंदू आणि हिंदुत्वावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “काही शब्द आपल्या आयुष्याला जोडलेले राहतात, ते काढता येत नाहीत. हिंदुत्व हा शब्द संघाला जोडला गेलेला आहे. हिंदुत्व कोणाला जिंकवण्याची चर्चा करत नाही.”

 

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित माजी सैनिक प्रबोधन कार्यक्रमात ते म्हणाले की, गेली ९६ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच विरोध होता. पण आम्ही समाजसेवा करत राहिलो. स्वयंसेवकांची सत्ता आल्यावर संघाला थोडा दिलासा मिळाला. सर्व अडथळ्यांवर मात करत ९६ वर्षे समाजसेवा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे गेला.

 

हिंदुत्व संघाशी जोडलेले, सत्तेचा रिमोट संघाकडे नाही!

  • सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वावरही खुलेपणाने भाष्य केले.
  • ते म्हणाले की काही शब्द आपल्या आयुष्याला जोडलेले राहतात, ते काढता येत नाहीत.
  • हिंदू हा शब्द हिंदुस्थानातून आला आहे.
  • हिंदुत्व हा शब्द संघाला जोडला गेलेला आहे.
  • हिंदुत्व कोणाला जिंकवण्याची चर्चा करत नाही.
  • हिंदुत्व हा शब्द सर्वप्रथम गुरू नानक देवजींनी वापरला.
  • हिंदुत्व हे सर्वांना जोडतं. कोणालाही तोडत नाही.
  • गेल्या ४० हजार वर्षांपासून सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे.
  • धर्म म्हणजे श्रद्धा, जी समाजाला जोडते. याचा अर्थ हिंदू आणि मुस्लिम असा नाही.
  • आपल्यात नेहमी फूट पडली म्हणून आपण गुलाम झालो.

 

चीन – पाकिस्तानवरही भाष्य

चीन आणि पाकिस्तानबद्दल सरसंघचालकांनी थेट नाव घेऊन काही म्हटलेलं नसलं, तरी अप्रत्यक्ष संदेश दिला, ते म्हणाले की, भारताचे कधीही कोणाशीही वैर राहिलेले नाही. पण जगात शत्रू आहेत. जर कोणी शत्रू असेल तर नतमस्तक होऊ नका, तर शत्रूला दाबून पुढे जा. ते म्हणाले की, लष्करी सज्जतेच्या बाबतीत आपल्या सैन्याची अमेरिका आणि चीनसारख्या देशांशी तुलना केली जाऊ शकते, परंतु साहस, धैर्य आणि सामर्थ्य या बाबतीत भारतीय सैन्य जगात अव्वल आहे. ही ताकद भारतीय सैनिकांच्या शारीरिक प्रशिक्षणातून येत नाही तर मनातून येते. भारतीय जवान शौर्याने लढतात. ते सीमेवर लढतात.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माजी सैनिकांची काळजी घेत असतो. संघाची पूर्व सैनिक सेवा परिषद संघटना आहे, जी संघाची विचारधारा लष्करी कुटुंबांपर्यंत पोहचवते. मोहन भागवत यांनी कार्यक्रमात हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमात एक मिनिट मौन पाळण्यात आले. त्यानंतर दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करून मौन पाळण्यात आले.


Tags: Ex-Servicemen Prabodhan ProgramHinduHindutvamuktpeethRashtriya Swayamsevak SanghSarsanghchalak Mohan Bhagwatमाजी सैनिक प्रबोधन कार्यक्रममुक्तपीठराष्ट्रीय स्वयंसेवक संघसरसंघचालक मोहन भागवतहिंदुत्वहिंदू
Previous Post

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास योजनेत घोटाळ्याचा भाजपाचा आरोप, राज्यपाल सरकारला चौकशीचे आदेश देणार

Next Post

२०२१मध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवर भारतात टॉप ट्रेंड कोणते?

Next Post
Facebook and Instagram review report 2021

२०२१मध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवर भारतात टॉप ट्रेंड कोणते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!