Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘पेगॅसस’ मोबाइल हेरगिरीवर सरकारला संसदेत प्रश्नही नको?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pegasus

मुक्तपीठ टीम

इस्रायली सायबर सुरक्षा कंपनी NSO च्या स्पायवेअर ‘पेगॅसस’वरून भारतात खळबळ उडाली आहे. भारतात अनेक पत्रकार आणि सेलिब्रिटींच्या फोनवर हेरगिरी केल्याचा दावा केला जात आहे. ‘पेगॅसस’ स्पायवेअरच्या गैरवापराच्या जागतिक वादादरम्यान केंद्र सरकारने राज्यसभेत याबद्दलचा खासदाराचा प्रश्न फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याविषयावरील जनहित याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. ‘पेगॅसस’चा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर चर्चा नको, असे कारण सरकारने दिले आहे. मात्र, आजवर अनेक न्यायप्रविष्ट मुद्द्यांवर संसदेत चर्चा झाली असल्याचा दावा करत हा मुद्दा मांडत सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

 

सरकारवर नियमांच्या गैरवापराचा आरोप

  • केंद्राने या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभा सचिवालयास पत्र लिहिले.
  • पत्रानुसार, माकपचे खासदार बिनॉय विश्वाम यांनी विचारलेल्या “प्रोव्हिजनली एक्सेप्टेड प्रश्न” (पीएक्यू) ला १२ ऑगस्टला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती.
  • खा. विश्वाम यांना याबद्दल अनौपचारिकपणे कळवण्यात आले आहे की, माझा प्रश्न नाकारला गेला आहे, परंतु मला अद्याप औपचारिक प्रतिसाद मिळालेला नाही.
  • सरकार राज्यसभेच्या नियमांचा गैरवापर करत आहे आणि सत्याबद्दल वेगळी भूमिका घेत आहे.
  • त्यांना ‘पेगॅसस’च्या संदर्भातील प्रश्नांना सामोरे जावेच लागेल.

 

खासदारांचा ‘पेगॅसस’वरील प्रश्नात काय?

  • ‘परदेशी कंपन्यांसह जीओआय सामंजस्य करार’ या विषयावर खासदार विश्वाम यांनी प्रश्न विचारला आहे.
  • “परराष्ट्र मंत्री पुढील मुद्दे स्पष्ट करतील का?
  • (अ) सरकारने किती सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे .
  • (ब) यापैकी कोणताही करार परदेशी कंपन्यांसोबत सायबर सुरक्षेद्वारे दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केला गेला आहे का? (त्याचे तपशिल)
  • देशभरात सायबर सुरक्षेद्वारे दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने एनएसओ समूहासोबत सामंजस्य करार केला आहे का, जर असेल तर कृपया तपशील द्या?

 

‘पेगॅसस’ प्रकरण न्यायालयात प्रलंबित

  • राज्यसभेच्या सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात केंद्राने प्रश्न विचारू नये अशी विनंती केली आहे.
  • ‘‘पेगॅसस’’ची चालू आधारावरील एक बाब जी न्यायालयाच्या निकालाच्या अधीन आहे.

 

‘‘पेगॅसस’’वर याचिका दाखल

  •  ‘‘पेगॅसस’’संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत.
  • या हेरगिरी प्रकरणाबाबत अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • ‘‘पेगॅसस’’चा वापर करून सरकारी यंत्रणांकडून कार्यकर्ते, राजकारणी, पत्रकार आणि घटनात्मक कार्यकर्त्यांची कथित हेरगिरी केल्याच्या अहवालांची न्यायालयीन देखरेख असलेल्या चौकशीची मागणी करण्यासाठी राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
  • याआधी वकील एमएल शर्मा यांनी याचिका दाखल केली होती, ज्यात ‘पेगॅसस’ची चौकशी एसआयटीच्या देखरेखी खाली करावी अशी मागणी केली होती.

हेही वाचा: फोनवर बोलताय…फोनवर काहीही करताय…सावधान! ’पेगॅसस’ आहे तिथं!!

 


Tags: ‘पेगॅससNSOpegasus spywareSupremeCourt
Previous Post

आता एनडीएतूनही जातीनुसार जनगणनेची मागणी, नितीशकुमारांचे मोदींना पत्र

Next Post

“राज्यात जुलैमध्ये १५ हजार ३२० बेरोजगारांना रोजगार”: नवाब मलिक

Next Post
nawab malik

"राज्यात जुलैमध्ये १५ हजार ३२० बेरोजगारांना रोजगार": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!