मुक्तपीठ टीम
येत्या गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, प्रत्येक बूथवर भाजपा आपला प्रचार जोरदार करत आहे. मात्र असं असताना नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा कमी होत गेल्या आहेत. गेल्या निवडणुकीत बहुमतापेक्षा फक्त सात जागा जास्त जिंकता आल्या. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजपासमोर मोठे आव्हान उभे आहे.
भाजपाची रणनीती!!
- दरम्यान एक संपूर्ण नवीन पिढी आली आहे. त्यांनाही जोडून पक्षाला पुढे जायचे आहे.
- उपलब्धी आणि भविष्यकालीन आश्वासनांच्या माध्यमातून मतदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे.
- यामुळेच भाजपा वेगवेगळ्या योजनांलब राज्यातील जनतेसमोर येत आहे.
- शेती असो, उद्योग असो, संरक्षण असो, क्रीडा असो किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असो, जो संदेश वर्ग देऊ शकतो तो समोर ठेवून पुढे जात आहे.
सातत्याने बड्या नेत्यांच्या भेटीगाठी!!
- पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
- बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची टीमही गुजरातमध्ये गुंतलेली आहे.
- गेल्या दोन महिन्यांपासून काही नेते राज्याच्या दौऱ्यावर होते.
- आता दिवाळीनंतर होणाऱ्या निवडणुकांपर्यंत बहुतांश नेते राज्यातील निवडणूक रणनीतीमध्ये व्यस्त राहणार आहेत.
मतदारांच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न…
- भाजपच्या रणनीतीकारांचे म्हणणे आहे की, पक्ष सर्व निवडणुका अत्यंत गांभीर्याने लढतो.
- सत्तेत असो वा विरोधात.
- मतदारांच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करतो.
- गुजरातमध्येही हीच रणनीती अवलंबली जात आहे.
- मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
- नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर २००२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून जागा कमी होत आहेत.