Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

October 22, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासह त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, छत्रपती संभाजीराजे भोसले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, सपकाळ नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळ, नाशिक न्युजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ-पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई, पुणे या शहरांच्या सोबत विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेले महत्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने जगात धार्मिक शहर म्हणून देखील नाशिकचा नावलौकीक आहे. त्याचप्रमाणे अनेक गडकिल्ल्यांचा वारसा लाभल्याने स्वराज्याच्या रक्षणाचे केंद्रबिंदू म्हणून नाशिक ओळखले जाते.  धार्मिक, सांस्कृतिक ओळख जपत नाशिक जिल्ह्याने उद्योग, कला, कृषी, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. पर्यटनाला चालना देवून नाशिकमध्ये विकास साधला जाईल. गडकिल्ल्‍यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी दिली.

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याकरिता शासनामार्फत नियोजन करण्यात येईल. नाशिक महानगर व जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून त्याला सर्वोतोपरी मदत करत आहे. उद्योग वाढीसाठी प्रयत्न करून रोजगार  निर्मितीवर राज्य शासनाच्यावतीने भर देण्यात येत आहे. पुरस्कारार्थींनी समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून  समाजहिताचे काम अखंड सुरू ठेवावे. तसेच आपल्या कामातून इतरही प्रेरित होतील यादृष्टिने प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात समर्पित भावनेतून जनेतेची सेवा करणाऱ्यांचा नाशिक रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. पुरस्कारार्थीनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामातून निश्चितच सर्वांना प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करत उपस्थितांना त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले, कोल्हापूर नंतर सर्वगुण संपन्न शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. रायगड किल्ला संवर्धनाच्या धर्तीवर नाशिक येथील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी समतेच्या लढ्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे इतिहास घडविला आहे. त्यामुळे नाशिक येथे शाहू महाराजांच्या   जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे स्मारक व्हावे. तसेच पर्यटनाच्या दृष्टिने जिल्ह्याचा विकास होण्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.

नाशिक रत्न म्हणून यांचा झाला सन्मान…

  • राजकीय क्षेत्र : डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  • पोलीस प्रशासन : सुनील कडासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक
  • प्रशासकीय : लीना बनसोड, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक
  • वैद्यकीय क्षेत्र : डॉ. आवेश पलोड, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक
  • विधिज्ञ : ॲङ नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक वकील परिषद
  • पर्यटन : शशिकांत जाधव, संचालक, नाशिक फ्लावर अँड शुभम वॉटर पार्क
  • बांधकाम : ललित रुंग्ठा, सीईओ, रुंग्ठा ग्रुप
  • व्यापार : राजेंद्र शहाणे, संचालक, मयुर अलंकार
  • उद्योग : प्रविण मराठे, सीईओ, ईशा पब्लिसिटी, नाशिक
  • शैक्षणिक : साने गुरूजी शिक्षण संस्था
  • शेती : शिवाजी ढोले, प्रयोगशील शेतकरी

            यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Tags: Chief Minister Eknath Shindegood newsHistoric Fortmuktpeethnashikऐतिहासिक गडकिल्लेघडलं-बिघडलंचांगली बातमीनाशिकमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

मोदी पंतप्रधान झाले आणि गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी होऊ लागल्या…असं का?

Next Post

मुंबईतील कोळीवाड्यांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पाहणी

Next Post
मुंबईतील कोळीवाड्यांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पाहणी 1.jpg

मुंबईतील कोळीवाड्यांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!