Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर

पुणे, गडचिरोली आणि जालना येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

June 17, 2021
in सरकारी बातम्या
0
rajesh tope

मुक्तपीठ टीम

राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर करण्याचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पुणे, गडचिरोली आणि जालना येथे सुरु करावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले.

 

मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री बोलत होते. या प्रकल्पाची संकल्पना खासदार सुप्रिया सुळे यांची असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अपंग हक्क विकास मंचचे राज्य संघटक अभिजित राऊत यांनी यावेळी त्याबाबत सादरीकरण केले. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव श्रीमती केरीकट्टा, आयुक्त डॉ.रामास्वामी, संचालक डॉ.साधना तायडे, अपंग हक्क विकास मंचचे राज्य समन्वयक विजय कान्येकर उपस्थित होते.

 

नवजात बालकांमधील श्रवण चाचणी ऑटोकॉस्टीक इमिशन (OAE) पद्धतीद्वारे तपासणी कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. बहिरेपणा रोखण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रम राज्यात १६ ठिकाणी राबविण्यात येत असून त्याची व्याप्ती वाढवितानाच संपूर्ण राज्यभर तो राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

बालकांमधील श्रवणशक्ती विषयक समस्यांची लवकर तपासणी झाल्यास त्यातील श्रवणदोष ओळखून आवश्‍यक तो उपचार करुन त्यावर मात करता येते. त्यामुळे बालकांच्या सर्वांगिण विकासाकरिता हा कार्यक्रम राबविणे महत्वाचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

सध्या राज्यात श्रवण व भाषाविषयक दिव्यांग व्यक्तींची संख्या ९२ हजाराच्या आसपास असून त्यातील ५१ टक्के ग्रामीण तर ४९ टक्के शहरी भागातील आहे. प्राथमिक स्तरावर ही तपासणी झाल्यास कर्णबधिरत्व टाळता येईल. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार या पद्धतीनुसार या कार्यक्रमाची आखणी करावी. मोबाईल युनिटमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जाऊन नवजात बालकांची तपासणी होऊ शकते. त्याचबरोबर बालकांच्या लसीकरण सत्राच्या वेळीस देखील श्रवणशक्ती तपासणी करता येऊ शकते. त्यासाठी मोबाईल युनिट वापरण्याचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पुणे, गडचिरोली आणि जालना येथे सुरु करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

 


Tags: Health Minister Rajesh Topemobile unitsnewbornspuneआरोग्य मंत्री राजेश टोपेखासदार सुप्रिया सुळेमोबाईल युनिट
Previous Post

अखेर शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा

Next Post

कोल्हापुरातील ४३ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ८४१ क्युसेक विसर्ग

Next Post
kolhapur

कोल्हापुरातील ४३ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ८४१ क्युसेक विसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!