Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ टिपणाऱ्याच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mobile That Captured Helicopter Sent For Forensic Analysis

मुक्तपीठ टीम

सहा डिसेंबर रोजी सीडीएस बिपिन रावत, त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि १३ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर कसे कोसळले याचा तपास ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी करत आहे. दरम्यान, कोईम्बतूर पोलिसांनी बुधवारी हेलिकॉप्टर अपघात होण्यापूर्वी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.

 

अपघातापूर्वी टिपला होता हेलिकॉप्टरचा व्हिडीओ

  • या प्रकरणाचा तपासाचा भाग म्हणून मोबाईल फोन ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • फोनचा मालक कोईम्बतूरचा वेडिंग फोटोग्राफर आहे.
  • हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी ८ डिसेंबरला तो मित्रांसह निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी भागात गेला होता.
  • त्या दिवशी तो मित्रांसोबत घनदाट जंगलात का गेला होता, जो वन्य प्राण्यांच्या हालचालीमुळे प्रतिबंधित क्षेत्र आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
  • दरम्यान पोलीस विभागाने चेन्नई हवामान विभागाकडून अपघाताच्या दिवशीचे तापमान आणि हवामानाशी संबंधित माहिती मागिवली आहे.
  • या अपघाताबाबत पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शीचीही चौकशी करत आहेत.
  • फुटेजमध्ये, IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर दाट धुक्यात अचानक गायब होते.
  • हेलिकॉप्टर पडल्याचाही मोठा आवाज येत आहे.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • या अपघाताच्या चौकशीसाठी आयएएफने त्रि-सेवा न्यायालयाची स्थापना केली आहे.

 

जनरल रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्याशिवाय ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान, स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंग (को-पायलट), ज्युनियर वॉरंट ऑफिसर (जेडब्ल्यूओ) राणा प्रताप दास, जेडब्ल्यू अरक्कल प्रदीप, लान्स ना. कुमार, लान्स नाईक बीएस तेजा, हवालदार सतपाल राय, नाईक गुरसेवक सिंग आणि नाईक जितेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले, त्यांना बंगळुरूच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Tags: CDS Bipin RawatHelicopter Crashmi-17V5 helicopterफॉरेन्सिक तपासणीसीडीएस बिपिन रावतहेलिकॉप्टऱ अपघात
Previous Post

लोकशाहीर लीलाधर हेगडे यांना राष्ट्र सेवा दलाची सांगितिक मानवंदना

Next Post

राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला सवाल: एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?

Next Post
raj thackeray

राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला सवाल: एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!