मुक्तपीठ टीम
आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. आता मनसेनेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ कलमी कार्यक्रम तयार केला आहे. सर्व विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना तो राबवण्याची सूचना दिली आहे. याअंतर्गत गणेशोस्तव, नवरात्रोत्सव मंडळे आणि गोविंदा पथकांची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आल्याचे कळते. विशेष म्हणजे यातील बहुतांश मंडळं शिवसेनेच्या प्रभावाखालील मानली जातात. त्यामुळे मनसेने शिवसेनेचं बळ असणारी स्थानिक मंडळं लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सक्रीय!
- मनसेने विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना विभागात २९ कलमी कार्यक्रम राबवा.
- मनसेच्या स्थानिक शाखेतील रिक्त पदे तातडीने भरा.
- इतर पक्षांतील अंतर्गत माहिती गोळा करा.
- मनसेचे विचार, कार्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया टीम सक्रीय करा.
शिवसेनेच्या प्रभावाखालील स्थानिक मंडळांवर मनसेचा डोळा
- आगामी निवडणुका लक्षात घेता गणशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे आणि गोविंदा पथकांची माहिती गोळा करा.
- या मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क वाढवा.
- त्यांचा विभागातील लोकांवरील प्रभावाची माहिती घ्या.
- परिसरातील जैन, बौद्ध या धर्मांच्या संस्था, पदाधिकाऱ्यांशीही संपर्क वाढवा.
- त्यांच्यातील समाजात प्रभावशाली लोकांची माहिती घ्या.
मनसेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करा!
- मनसेचे संघटनात्मक बळ वाढवा.
- नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीनुसार संभाव्य उमेदवारांची माहिती गोळा करा.
- प्रभागांच्या पुनर्रचनेनुसार पदाधिकारी नेमा.
- इतर पक्षातील इच्छुकांचा ताबडतोब पक्षात घ्या.
- अन्य पक्षांतील नाराजांना मनसेकडे वळवा.
- पक्षात तरुण नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी लक्ष केंद्रित करा.
नगरसेवकांच्या कामांची झाडाझडती घ्या!
- गेल्या निवडणुकीत तुमच्या विभागातून निवडून गेलेल्या नगरसेवकांनी दिलेली आश्वासनं, न केलेली कामे यांची माहिती घ्या.
- प्रभागातील प्रतिष्ठित, सुशिक्षितांमधील संभाव्य उमेदवारांची माहिती मिळवा.
- तसेच सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे.
- त्यामुळे अशा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.