मुक्तपीठ टीम
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे स्थगित झालेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा येत्या २ एप्रिल रोजी होणार आहे. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे भव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे. मुंबई मनपाने मेळाव्याला परवानगी दिली असून संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत या कार्यक्रम होणार आहे. मनपा निवडणूक तोंडावर असल्याने या मेळाव्याच्या माध्यमातून ते मनपा निवडणुकीचे रणशिंगही फुंकण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजी पार्कला राज ठाकरे उपस्थित राहणार…
- यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे भव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे.
- मनसेतर्फे १४ मार्च रोजी वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती.
- या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटीलसह इतर मनसे नेतेही होते.
- शिवाजी पार्कवर शिवजयंतीला स्वतः राज ठाकरे उपस्थित असतील, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला अधिक महत्व…
- मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी या मेळाव्याची माहिती दिली.
- येत्या २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर हा मेळावा होत आहे.
- मनसेचा पाडावा मेळावा कोरोना काळानंतर होत आहे.
- त्यामुळे आमच्यासाठी हा मोठा उत्सव असेल.
- या मेळाव्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.
- दोन वर्ष जे काही चाललं आहे एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे.
- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला अधिक महत्त्व आहे.